आळंदी (अर्जुन मेदनकर) : आळंदी शहरातील पथविक्रेत्यांच्या संदर्भात महाराष्ट्र राज्य कामगार सुरक्षा दल संलग्न पथारी सुरक्षा दलाच्या वतीने संघर्ष नायक भगवानराव वैराट साहेब यांच्या मार्गदर्शनाने पुणे जिल्हा अध्यक्ष संतोष सोनवणे यांच्या शिष्टमंडळाने आळंदी नगरपरिषद मुख्याधिकारी साहेब यांच्याशी चर्चा करून सर्वोच्च न्यायालय,केंद्र शासन,राज्य शासनाने वेळोवेळी पथविक्रेत्यांसाठी कायदा केलेला आहे त्याच कायद्याप्रमाणे न्याय मिळाला पाहिजे अशी खंबीर भूमिका पुणे जिल्हा अध्यक्ष संतोष सोनवणे यांनी कायद्याच्या माध्यमातून मांडणी करत पहिल्यांदा पथविक्रेत्यांना योग्य ठिकाणी जागा द्या मगच पुढील काम करा,भाजी मंडईतील चौपाळ मागील 35 ते 40 भाजी स्टॉल धारक उध्वस्त करून त्या जागी लोखंडी गेट लावण्याचे मनमानी कारभारातून चालू आहे पथविक्रेत्यांना न्याय मिळालाच पाहिजे कायद्याला बाजूला करत जर मनमानी कारभार होणार असेल या गोरगरीब पथविक्रेत्यांवर जर अन्यायकारक कारवाई होणार असेल जर आमच्या निवेदनाची योग्य दखल आपण घेतली नाही तर संघटनेच्या वतीने आपल्या नगरपरिषदेसमोर लक्षवेधी बोंब मारो आंदोलन करणार आहोत आधी पुनर्वसन करा मग कारवाई चौफळ मागील पथविक्रेते बाधित होत असेल तर पहिल्यांदा त्यांना योग्य ठिकाणी जागा द्या मगच या ठिकाणी तुमच्या कामाला सुरुवात करा असे पुणे जिल्हा अध्यक्ष संतोष सोनवणे यांनी मुख्याधिकाऱ्यांसी चर्चा करून निवेदन दिले, सर्वोच्च न्यायालय,केंद्र शासन,राज्यशासनाने पथविक्रेत्याचे राहणीमान उंचावण्यासाठी आणि पथविक्रेता हा समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तो स्वावलंबी होण्यासाठी अनेक योजना देऊन पथविक्रेता अधिनियम 2014 हा कायदा त्यांच्या संरक्षणासाठी केलेला आहे त्यावर मुख्याधिकारी साहेब यांनी सकारात्मक उत्तर देत या कामात बाधित होत असणाऱ्या पथविक्रेत्यांना योग्य ठिकाणी बसविण्यात येईल मगच आम्ही आमच्या कामाला सुरुवात करू असे मुख्याधिकारी यांनी सांगत संबंधित अधिकारी गायकवाड यांना भाजी मंडईत चौपाळ या ठिकाणी पाहणी करण्यास सांगितले त्याप्रमाणे गायकवाड यांनी भाजी मंडई मध्ये सर्व कार्यकर्ते व संघटनेच्या शिष्टमंडळांसोबत समक्ष चर्चा करून आपण काळजी करू नका पहिल्यांदा सर्व बाधित होणाऱ्या पथविक्रेत्यांना योग्य ठिकाणी बसवण्यात येईल आणि मगच आम्ही आमच्या कामाला सुरुवात करणार आहोत असे गायकवाड यांनी सांगितले.
त्यामुळे संघटनेने लावून धरलेल्या मागणीला यश मिळाले आहे आणि या गोरगरीब पथविक्रेत्यांच्या पाठीशी पक्का आधारआदरणीय संघर्ष नायक भगवानराव वैराट साहेब आहेत त्यामुळे वैराट साहेबांच्या नावाच्या घोषणा देत कार्यकर्त्यांनी भाजी मंडईत जल्लोष करत वैराट साहेब आगे बढो हम तुम्हारे साथ है संतोष सोनवणे आगे बढो हम तुम्हारे साथ है अशा घोषणा दिल्या. शिष्टमंडळामध्ये प्रमुख नेतृत्व पुणे जिल्हा अध्यक्ष संतोष सोनवणे,सचिन काळे,निलेश ठोकणे,गजानन मिटकरी,नवनाथ बोडरे,राहुल रायबोले,नवनाथ तिडके,ऋषिकेश मुंडे,नितीन भुजबळ,नारायण वाघमारे,तुकाराम बोडरे,महाजन बाबा, श्रीधर कलाटे,साबळे महाराज,दिघे पाटील, सह पदाधिकारी कार्यकर्ते महिला आघाडी उपस्थित होते.
