PCMC : आचारसंहिता कालावधीत महापालिका क्षेत्रीय कार्यालयात होणाऱ्या जनसंवाद सभा रद्द


पिंपरी चिंचवड (क्रांतीकुमार कडुलकर) : पिंपरी चिंचवड महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या आचारसंहिता कालावधीत महापालिकेमार्फत सर्व क्षेत्रीय कार्यालयांमध्ये दर महिन्याच्या दुसऱ्या व चौथ्या सोमवारी होणाऱ्या जनसंवाद सभा पुढील आदेशापर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत.

याबाबत आयुक्त तथा निवडणूक अधिकारी श्रावण हर्डीकर यांच्या स्वाक्षरीने प्रशासन विभागाने स्वतंत्र आदेश निर्गमित केले आहेत.

राज्य निवडणूक आयोगाच्या वतीने महापालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ ची आचारसंहिता १५ डिसेंबर २०२५ ते १६ जानेवारी २०२६ या कालावधीत घोषित केली आहे. आचारसंहिता लागू असल्याने या कालावधीत जनसंवाद सभांचे आयोजन केले जाणार नाही याची नागरिकांनी नोंद घ्यावी, असे महापालिका प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे.

नागरिकांशी सुसंवाद साधणे, तक्रारींचे निराकरण करणे आणि प्रशासकीय निर्णयांमध्ये तसेच होणाऱ्या विकासकामांमध्ये नागरिकांच्या आशा आकांक्षांचे प्रतिबिंब उमटावे, यासाठी क्षेत्रिय कार्यालयनिहाय कार्यालयीन कामकाजाचा दिवस असलेल्या प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या व चौथ्या सोमवारी जनसंवाद सभेचे आयोजन केले जाते.

थोडे नवीन जरा जुने