Nashik : अनंतकोटीचे संजय तळोले, दिगंबर थोरात व किशोर थोरात यांना ‘शिवछत्रपती महाराष्ट्र गौरव पुरस्कार २०२६’ प्रदान



सिन्नर (जि. नाशिक) संजीवनी फाउंडेशन, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने देण्यात येणारा शिवछत्रपती महाराष्ट्र गौरव पुरस्कार २०२६ अध्यात्मिक व सेवाभावी क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल अनंतकोटी श्री स्वामी समर्थ सेवा मार्ग ट्रस्टचे संजय तळोले, दिगंबर थोरात व किशोर थोरात यांना प्रदान करण्यात आला. हा मानाचा पुरस्कार आज सिन्नर येथे पार पडलेल्या समारंभात महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री बच्चू कडू व माजी मंत्री रविकांत तुपकर यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला.

हा पुरस्कार सोहळा संजीवनी फाउंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाचे आयोजन फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर सानप यांनी केले होते. यावेळी सामाजिक, अध्यात्मिक, शैक्षणिक व विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संजय तळोले हे गेली ३५ वर्षे अखंडपणे श्री स्वामी समर्थ सेवा मोफत स्वरूपात करत असून, अनंतकोटी श्री स्वामी समर्थ सेवा मार्ग ट्रस्टच्या माध्यमातून त्यांनी पुणे शहरात मोठ्या प्रमाणावर अध्यात्मिक व सेवाभावी कार्य सुरू केले आहे. गरजू, अडचणीत सापडलेल्या नागरिकांना आधार, मार्गदर्शन व अध्यात्मिक बळ देण्याचे कार्य ते सातत्याने करीत आहेत.

दिगंबर थोरात हे गेली ३० वर्षे संजय तळोले यांच्यासमवेत स्वामी समर्थ सेवेत सक्रिय असून, ते अनंतकोटी श्री स्वामी समर्थ सेवा मार्ग ट्रस्टचे अध्यक्ष आहेत. शेतकरी कुटुंबातून आलेले दिगंबर थोरात हे संगमनेर तालुक्यातील जोरवे गावचे रहिवासी असून, ग्रामीण भागातील लोकांसाठी अध्यात्माच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपण्याचे कार्य ते करीत आहेत.

किशोर थोरात हे सामाजिक, शैक्षणिक व अध्यात्मिक क्षेत्रात कार्यरत असलेले एक सक्रिय व्यक्तिमत्त्व असून, ते

– सामाजिक कल्याण एवं मानव संरक्षण संघ – महाराष्ट्र राज्य अध्यक्ष,

– आधार शैक्षणिक संस्था, पुणे – सचिव,

– अनंतकोटी श्री स्वामी समर्थ सेवा मार्ग ट्रस्ट – सचिव

आणि

– श्री समर्थ शैक्षणिक व सामाजिक संस्था – संस्थापक अध्यक्ष

म्हणून कार्यरत आहेत. स्वामी समर्थ सेवेमधून त्यांनी समाजातील अनेक गरजू व्यक्तींना आधार, प्रेरणा व मार्गदर्शन दिले आहे.

संजय तळोले, दिगंबर थोरात व किशोर थोरात यांच्या दीर्घकालीन, निःस्वार्थ व बहुआयामी सेवाभावी कार्याची दखल घेत संजीवनी फाउंडेशनच्या वतीने हा सन्मान प्रदान करण्यात आला. या पुरस्कारामुळे तिन्ही सेवाभावी कार्यकर्त्यांवर सर्व स्तरांतून अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

थोडे नवीन जरा जुने