पिंपरी चिंचवड (क्रांतीकुमार कडुलकर): प्राधिकरणातील सेक्टर 4 ते 13, इंद्रायणी नगर, शिवाजीवाडी मोशी या भागात होत असलेला दूषित पाणीपुरवठा लवकरात लवकर व्यवस्थित करून नागरिकांना शुद्ध पाणी पुरवणे बाबत चिखली मोशी पिंपरी चिंचवड हौसिंग सोसायटी फेडरेशनचे अध्यक्ष संजीवन सांगळे यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन दिले आहे.
माननीय आयुक्त साहेब, वरील विषयानुसार आपणाला सुचित करण्यात येते की, मोशी प्राधिकरणातील सेक्टर 4 ते 13 तसेच शिवाजीवाडी मोशी, बोऱ्हाडेवाडी या परिसरात महानगरपालिकेकडून अत्यंत दूषित स्वरूपात पाणीपुरवठा होत आहे. महानगरपालिकेकडून पुरवण्यात येणाऱ्या पाण्याला खूप मोठ्या प्रमाणात दुर्गंधी येत आहे. त्याचप्रमाणे पाण्याचा कलर देखील पिवळसर स्वरूपाचा आहे. या दूषित पाणीपुरवठ्यामुळे या परिसरातील लहान मुले, वयोवृद्ध नागरिक तसेच महिला भगिनी त्याचप्रमाणे इतर नागरिक यांना विविध प्रकारचे आजार होत आहेत. दूषित पाणीपुरवठा ही अतिशय गंभीर बाब आहे.हा नागरिकांच्या आरोग्यासी निगडित असा हा प्रश्न असल्याकारणाने कृपया लवकरात लवकर महानगरपालिकेकडून सदर भागांमध्ये शुद्ध पाणीपुरवठा करण्यात यावा. जोपर्यंत शुद्ध पाणीपुरवठा होत नाही तोपर्यंत महानगरपालिकेकडून सदर भागांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात यावा.
पुढील चार-पाच दिवसात या परिसरातील पाणीपुरवठा व्यवस्थित झाला नाही तर फेडरेशन मार्फत खूप मोठ्या प्रमाणात आंदोलन केले जाईल याची कृपया नोंद घ्यावी आणि लवकरात लवकर नागरिकांना शुद्ध पाणीपुरवठा करावा ही विनंती...
प्रत माहितीसाठी व योग्य ती कारवाईसाठी
1) माननीय आमदार पै.श्री. महेशदादा लांडगे भोसरी विधानसभा
2) मा.मुख्य अभियंता पाणीपुरवठा विभाग पिंपरी चिंचवड महापालिका पिंपरी पुणे 18
3) मा.कार्यकारी अभियंता पाणीपुरवठा विभाग पिंपरी चिंचवड मनपा पिंपरी पुणे 18
