PCMC : कै मीनाताई ठाकरे जलतरण तलाव चालु करा - अन्यथा मनसे आंदोलन करणार


अतिरिक्त आयुक्त, क्रिडा विभाग यांना दिले निवेदन

पुढील १५ ते २० दिवसात जलतरण तलाव चालु करणार असे आश्वासन  अतिरिक्त आयुक्त, पाटील साहेब यांनी मनसेचे शहराध्यक्ष सचिन चिखले यांना दिले आहे.

पिंपरी चिंचवड (क्रांतीकुमार कडुलकर) : प्रभाग -१३ मधील यमुनानगर भागामधील कै मीनाताई ठाकरे जलतरण तलाव गेले अनेक दिवसांपासून बंद आहे.

तलावातील पाणी न बदल्यामुळे पुर्ण पाणी हिरवे गार झाले आहे . त्यामुळे परिसरात डेंग्यू मलेरिया यांची लागंण होऊ शकते. तलाव परिसरात पुर्ण कचरा पडला आहे व साहित्य अस्तव्यस्त पडलेले आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर अध्यक्ष सचिन चिखले यांनी निवेदनात प्रशासकीय यंत्रणेवर सडकून टीका केली आहे.

मागिल वर्षीच मोठ्या प्रमाणात स्थापत्य विभागाच्या वतीने लोखो रुपये खर्च करून तलाव चालु करण्यात आला होता परंतु तो काही दिवसात लगेच तो बंद करण्यात आला. त्या मागचे कारण समजू शकले नाही.त्यामुळे यमुनानगर,निगडी ,साईनाथनगर , सेक्टर २२ मधील सर्व जलतरण पटू न नागरीक नाराजी व्यक्त करत आहेत.

 आताच काही दिवसा पुर्वी नेमणुक करण्यात आलेला ठेकेदार ( H2O ) एजेन्सी  प्रभागातील काही नागरिकांचे पैसे घेऊन पास देण्यात आले त्या पास चा कालावधी एक वर्षाचा होता ती मुदत न संपताच ठेकेदार यांनी तलाव बंद केला आहे तरी संबंधित ठेकेदार यांच्यावर कारवाई करण्यात यावी व लवकरात लवकर तलाव चालु करण्यात यावा असे पत्र अतिरिक्त आयुक्त पाटील साहेब यांना देण्यात आले व च विनंती करण्यात आली आहे. अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना या विषयावर आंदोलन करेल, असा इशारा दिला आहे.

 पुढील १५ ते २० दिवसात जलतरण तलाव चालु करणार असे आश्वासन  अतिरिक्त आयुक्त, पाटील साहेब यांनी मनसेचे शहराध्यक्ष सचिन चिखले यांना दिले आहे.

निवेदन देण्यासाठी मनोज लांडगे , दत्ता देवतरासे , मुजू हे उपस्थित होते.

थोडे नवीन जरा जुने