पिंपरी चिंचवड ((क्रांतीकुमार कडुलकर) : “ उच्च शिक्षण आणि शाश्वत विकास या विषयावर एकदिवसीय राज्यस्तरीय परिसंवाद सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सहकार्याने गुणवत्ता सुधारणा कार्यक्रमांतर्गत चिंचवड येथील कमला एज्युकेशन सोसायटी संचलित प्रतिभा शिक्षणशास्त्र महाविद्यालयाच्या वतीने महाविद्यालयात आयोजित करण्यात आला. मोठ्या उत्साहात आणि शैक्षणिक वातावरणात परीसंवाद पार पडला.
या एकदिवसीय परिसंवादाचे सकाळच्या सत्रात उद्घाटन एसपीपीयू महाविद्यालयाच्या विभाग प्रमुख व वक्त्या डॉ . गीता शिंदे , प्रख्यात शिक्षणतज्ञ डॉ . चित्रा सोहनी याच्या समवेत उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. त्याचा महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. पोर्णिमा कदम यांच्या हस्ते पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला.
उद्घाटन सत्रामध्ये शिक्षण क्षेत्रातील या तज्ञ मान्यवरांनी उच्च शिक्षण आणि शाश्वत विकास यांचे महत्त्व अधोरेखित करून उच्च शिक्षण प्रणालीमध्ये शाश्वत विकासाच्या संकल्पनेचा समावेश कसा करता येईल याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. विद्यापीठातीत शिक्षण विभाग प्रमुख डॉ. गीता शिंदे व प्रख्यात शिक्षणतज्ञ डॉ. चित्र सोहनी यांनी अध्यापन पद्धतींमधून शाश्वत विकासाच्या मूल्यांचा प्रसार कसा करता येईल हे सांगितले आणि यावर चर्चा करण्यात आली.
दुपारच्या सत्रात पी. ए. इनामदार विद्यापीठाच्या आधिष्ठाता डॉ. अनिता बेलापूरकर यांनी शाश्वत विकासासाठी समावेशकता , या विषयावर सर्वसमावेशक शिक्षणाची भूमिका आणि समाजातील सर्व घटकांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे महत्त्व स्पष्ट करून दिले .
गुणवत्तापूर्ण शिक्षण - एक शाश्वत ध्येय या विषयावर सत्र झाले. या सत्रात शिक्षण विषयातील तज्ञ डॉ. अर्चना चौधरी यांच्याद्वारे दर्जेदार शिक्षण हे शाश्वत विकासाचे महत्त्वाचे उद्दिष्ट असल्याचे अधोरेखित करण्यात आले आणि शिक्षणाच्या गुणवत्तावृद्धीसाठी विविध उपाय सुचविण्यात आले.
समारोप समारंभात सर्व प्रा. अस्मिता यादव यांच्याद्वारे व प्रमाणपत्र वितरण संस्थेचे मुख्य प्रशासकीय अधिकारी डॉ राजेंद्र कांकरीया , समन्वयीका प्रा आस्मिता यादव , प्राचार्या डॉ . पोर्णिमा कदम , डॉ . सुवर्णा गायकवाड,याच्या हस्ते संशोधक व सहभागी विद्यार्थ्याना प्रा आस्मिता यादव , प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली.
परीसंवादाचे प्रास्ताविक व आभार परिसंवादाच्या समन्वयीका प्रा अस्मीता यादव यानी केले .
या परिसंवादामुळे शिक्षण क्षेत्रातील शिक्षक, संशोधक आणि विद्यार्थ्यांना शाश्वत विकासाशी संबंधित विविध पैलूंवर विचारमंथन करण्याची संधी मिळाली. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संस्थेचे सचिव डॉ. दीपक शहा यांचे मार्गदर्शन, महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. पोर्णिमा कदम तसेच सर्व प्राध्यापकवृंद, कर्मचारी व विद्यार्थ्यांनी मोलाचे सहकार्य केले. एकूणच हा राज्यस्तरीय परिसंवाद अत्यंत यशस्वीरीत्या पार पडला.
