Iran war : ताज्या घडामोडी (LIVE अपडेट्स) इराणचा तेल अवीववर “क्लस्टर वॉरहेड”सह जोरदार प्रत्युत्तरात्मक हल्ला




तेल अवीव : टाइम्स ऑफ इस्रायलच्या वृत्तानुसार , तेल अवीवजवळील रामत गन भागात २ जणांचा मृत्यू झाला.संयुक्त अरब अमिराती आणि कतार यांनी इराणकडून डागण्यात आलेल्या क्षेपणास्त्रांना अडवले (intercept केले). इराणने इस्रायलवर डागलेली अलीकडील बॅलिस्टिक क्षेपणास्त्र हल्ला मध्य इस्रायलला लक्ष्य करत असल्याचे दिसत असून, उपलब्ध फुटेजनुसार त्यामध्ये क्लस्टर बॉम्ब वॉरहेडचा वापर करण्यात आला असावा.

हल्ल्याच्या ठिकाणी आपत्कालीन वैद्यकीय पथके पोहोचली असून, सध्या तरी जखमींबाबत कोणतीही अधिकृत माहिती नोंदवली गेलेली नाही. लेबनॉनची राजधानी बेरूत येथे इस्रायली हल्ल्यांत किमान ६ जण ठार, २४ जखमी (प्राथमिक आकडे).

इस्रायलने मंगळवारी इराणचे वरिष्ठ नेते अली लारिजानी आणि जनरल घोलाम रझा सोलेमानी यांना ठार केल्याचा दावा केला. यामुळे इराणला मोठा धक्का बसला. अमेरिका सैन्याने हॉर्मुझ सामुद्रधुनीजवळील इराणच्या क्षेपणास्त्र तळांवर हल्ले केल्याचे सांगितले. या भागात आंतरराष्ट्रीय जहाजवाहतुकीला धोका असल्याचे अमेरिकेचे म्हणणे आहे.


अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नाटो व इतर मित्रदेशांनी हॉर्मुझ सामुद्रधुनी सुरक्षित करण्यासाठी पुरेसा पाठिंबा दिला नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली.

इराणने आपल्या राष्ट्रीय सुरक्षा प्रमुख अली लारिजानी यांच्या मृत्यूची पुष्टी केली. तसेच, इस्रायलने इराणच्या नव्या सर्वोच्च नेत्याला लक्ष्य करण्याची धमकी दिली आहे: मोजतबा खामेनेई.

यापूर्वीच इराणचे दीर्घकालीन नेते आयातुल्ला अली खामेनेई यांचा काही आठवड्यांपूर्वी अमेरिकन–इस्रायली हल्ल्यात मृत्यू झाला होता, ज्यामुळे पश्चिम आशियात हा संघर्ष अधिक तीव्र झाला.

एकूण परिस्थिती:

पश्चिम आशियातील संघर्ष दिवसेंदिवस गंभीर होत असून,रशिया आणि इराणची मित्र राष्ट्रे iranla मदत करताना दिसून येत आहे. इराण–इस्रायल थेट युद्धाच्या दिशेने परिस्थिती झपाट्याने बिघडत आहे. अमेरिका, गल्फ देश आणि नाटो यांचा सहभाग वाढल्याने हा संघर्ष व्यापक होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

थोडे नवीन जरा जुने