इराणची ऊर्जा संसाधने ताब्यात घेण्यासाठी अमेरिकेने लादलेले इराणवर युद्ध - मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष

 


पुणे ( क्रांतीकुमार कडुलकर) : जागतिक क्रमवारीमध्ये इराण हे जगातील सर्वात मोठे ऊर्जा स्त्रोत असलेल्या देशांपैकी एक आहे. २०२६ च्या ताज्या अहवालानुसार त्यांची स्थिती खालीलप्रमाणे आहे:

​१. नैसर्गिक वायू (Natural Gas)

​साठा (Reserves): इराणचा नैसर्गिक वायूचा साठा जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे (रशियानंतर). इराणमधील 'साऊथ पार्स' (South Pars) हे जगातील सर्वात मोठे वायू क्षेत्र मानले जाते.

​उत्पादन (Production): उत्पादनाच्या बाबतीत इराण जगात तिसऱ्या क्रमांकावर आहे.

​२. कच्चे तेल (Crude Oil)

​साठा (Reserves): कच्च्या तेलाच्या साठ्यामध्ये इराणचा जगात तिसरा क्रमांक लागतो (व्हेनेझुएला आणि सौदी अरेबियानंतर). इराणकडे अंदाजे २०८-२०९ अब्ज बॅरल तेलाचा साठा आहे.

​उत्पादन (Production): उत्पादनामध्ये इराण जगातील ७ व्या क्रमांकाचा मोठा देश आहे.

१९७९ च्या इस्लामिक क्रांती मध्ये अमेरिकेनं धार्जिणा रझा पहेलवीची सत्ता उलथल्यापासून  संपूर्ण गल्फमध्ये अमेरिका विरोध असलेल्या इराणने अमेरिकन कंपन्यांना हाकलून दिले. तेल आणि नैसर्गिक वायूची उत्पादन आणि विक्री डॉलर मध्ये करणे बंद केले. भारतासाहित चीन आणि इतर गरीब देशांना त्यांच्या चीनमध्ये क्रूड गॅस विक्री सुरू केली. इराणने भारताशी मैत्री करून काश्मीर प्रश्नावर भारताची बाजू घेतली. इराणला रशिया, चीनने पाठिंबा दिला. असे कॉम्रेड गणेश दराडे, राज्य कमिटी सदस्य, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. 

त्यांनी आरोप केला आहे की, जगभरच्या तेलसाठ्यावर कब्जा मिळवण्यासाठी अमेरिका खोटे आरोप करून गरीब व तेल संपन्न देशावर लष्करी कारवाई करते. इराक, लिबिया,व्हेनेझुएला या देशातील सत्ता उलथवण्यासाठी अमेरिकेने साम्राज्यवादी युद्धे लादली आहेत. इस्राएल हे अमेरिकेचे युद्धखोर साधन असलेले राष्ट्र आहे. 

अमेरिकेने इराणवर ​निर्बंध लादून त्यांची अर्थव्यवस्था खिळखिळी करूनही ते राष्ट्र आज एकटे लढत आहे.  इराणवर असलेल्या आंतरराष्ट्रीय निर्बंधांमुळे त्यांच्या उत्पादन क्षमतेवर आणि निर्यातीवर मोठा परिणाम झाला आहे. तरीही, चीन हा इराणच्या तेलाचा मोठा खरेदीदार आहे.

​२०२६ ची सद्यस्थिती: सध्याच्या (मार्च २०२६) मध्य-पूर्व आशियातील तणावामुळे आणि ऊर्जा केंद्रांवरील हल्ल्यांमुळे इराणच्या तेल आणि वायू उत्पादनात काही प्रमाणात चढ-उतार पाहायला मिळत आहेत, ज्याचा परिणाम जागतिक किमतींवरही होत आहे. अमेरिकेच्या आक्रमक युद्धखोर नीतीचा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष निषेध करत आहे. असे कॉम्रेड दराडे यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.




थोडे नवीन जरा जुने