भुसावळमध्ये ECHS अंतर्गत भरती; फार्मासिस्ट ते शिपाई पदांसाठी संधी

भुसावळमध्ये ECHS अंतर्गत भरती; फार्मासिस्ट ते शिपाई पदांसाठी संधी Recruitment under ECHS in Bhusawal; Opportunities for Pharmacist to Peon posts


ECHS Recruitment : माजी सैनिक सहयोगी आरोग्य योजना (ECHS) भुसावळ अंतर्गत विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज करण्याची शेवटची तारीख ५ एप्रिल २०२६ निश्चित करण्यात आली आहे. या भरतीद्वारे एकूण ४ रिक्त पदे भरण्यात येणार असून त्यामध्ये फार्मासिस्ट, दंतवैद्यकीय ए/टी/एच, लिपिक आणि शिपाई या प्रत्येकी एका पदाचा समावेश आहे.

फार्मासिस्ट पदासाठी बी.फार्म किंवा भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र विषयांसह १०+२ शिक्षण व किमान ३ वर्षांचा अनुभव आवश्यक आहे. दंतवैद्यकीय ए/टी/एच पदासाठी Dental Hygiene पदविका / Class 1 DH / DORA (सशस्त्र दले) आणि किमान ५ वर्षांचा अनुभव आवश्यक आहे. लिपिक पदासाठी पदवीधर किंवा सशस्त्र दलातील लिपिकीय अनुभव (किमान ५ वर्षे) अपेक्षित आहे, तर शिपाई पदासाठी इयत्ता ८ वी उत्तीर्ण किंवा GD ट्रेड (सशस्त्र दले) व किमान ५ वर्षांचा अनुभव आवश्यक आहे.

या पदांसाठी अनुक्रमे फार्मासिस्ट व दंतवैद्यकीय ए/टी/एच यांना ₹३६,५००, लिपिक पदासाठी ₹२९,२०० आणि शिपाई पदासाठी ₹२१,८०० इतके मासिक वेतन देण्यात येणार आहे. नोकरीचे ठिकाण भुसावळ (जळगाव) येथे राहणार असून इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज OIC ECHS सेल, Stn HQ भुसावळ, PO: ऑर्डनन्स फॅक्टरी भुसावळ, पिन – ४२५२०३ या पत्त्यावर पाठवावा. पात्र उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रांसह अर्ज वेळेत पाठवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.


अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा
जाहिरात येथे क्लिक करा

नोकरीच्या अधिक बातम्यांसाठी येथे क्लिक करा

थोडे नवीन जरा जुने