MGID Header Code
Code End

एप्रिल महिन्यात वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी घ्यावयाची काळजी व उपाययोजना

 


पिंपरी चिंचवड : सध्या एप्रिल महिन्यात तापमानात लक्षणीय वाढ होत असून पुढील काही दिवसांत उष्णतेची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर उष्माघात (Heat Stroke), निर्जलीकरण (Dehydration) आणि डोकेदुखी यांसारख्या त्रासांची शक्यता वाढत आहे. नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने खालीलप्रमाणे आवश्यक काळजी व उपाययोजना करणे अत्यंत गरजेचे आहे.

नागरिकांनी घ्यावयाची काळजी:

दुपारी १२ ते ४ या वेळेत शक्यतो घराबाहेर पडणे टाळावे.

उन्हात बाहेर जाताना डोक्यावर टोपी, रुमाल किंवा छत्रीचा वापर करावा.

पुरेशा प्रमाणात पाणी, लिंबूपाणी, ताक, नारळपाणी यांसारखे द्रवपदार्थ नियमित घ्यावेत.

हलका, सैल आणि फिकट रंगाचे कपडे वापरावेत.

जास्त तेलकट, तिखट व उष्ण पदार्थांचे सेवन टाळावे.

लहान मुले, ज्येष्ठ नागरिक व गर्भवती महिलांनी विशेष काळजी घ्यावी.

उष्माघाताची लक्षणे ओळखा:

तीव्र डोकेदुखी

चक्कर येणे किंवा अशक्तपणा

त्वचा गरम व कोरडी होणे

उलट्या किंवा मळमळ

शरीराचे तापमान वाढणे

उपाययोजना:

उष्माघाताची लक्षणे दिसल्यास व्यक्तीला त्वरित सावलीत किंवा थंड ठिकाणी आणावे.

शरीरावर थंड पाण्याचे पट्टे ठेवावेत.

रुग्णाला पाणी किंवा ओरल रिहायड्रेशन सोल्युशन (ORS) द्यावे.

आवश्यक असल्यास जवळच्या आरोग्य केंद्रात त्वरित वैद्यकीय मदत घ्यावी.

प्रशासनाकडून नागरिकांना आवाहन करण्यात येते की, वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर सतर्क राहून वरील सूचना पाळाव्यात आणि स्वतःचे तसेच कुटुंबीयांचे आरोग्य सुरक्षित ठेवावे.

थोडे नवीन जरा जुने