अधिक मास निमित्त भव्य दिव्य ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा

          


                                                 

 संत ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका देवस्थानचा उपक्रम   

आळंदी (अर्जुन मेदनकर) : पुणे आळंदी रस्त्यावरील वडमुखवाडी येथील श्री संत ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका देवस्थान ट्रस्ट चे वतीने अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. यात श्री संत ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा उत्साहात होणार आहे. पारायण सोहळ्याचे व्यासपीठ नेतृत्व ह. भ. प. आचार्य भगवानजी महाराज शास्त्री आळंदी करणार आहेत. पुरूषोत्तम मास म्हणजेच अधिक मास सुरू झालेला आहे.

  पुरुषोत्तम मास हा नाम चिंतन, श्रवण, भजन,  कीर्तन या साठी पर्वणी आहे. भाविक, नागरिकांनी या सप्ताहात धार्मिक पर्वणीत उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी. असे आवाहन  श्री संत ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका देवस्थान मंदिर ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष ॲड. विष्णू तापकीर यांनी केले. शनिवार २३ ते ३० मे २०२६ या दरम्यान श्री ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानेश्वरी पारायण सोहळा तसेच शनिवार ३० मे ते ६ जून २०२६ या कालावधीत धार्मिक पर्वणीचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री संत ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका देवस्थान ट्रस्ट चे अध्यक्ष ॲड विष्णू तापकीर यांनी केले आहे.

थोडे नवीन जरा जुने