व्हिएतनाम येथे होणाऱ्या इंटरनॅशनल म्युझिक फेस्टमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणार लिशा मतकर

 


— आठ वर्षाच्या लिशा मतकर व्हिएतनाम येथील आंतरराष्ट्रीय संगीत महोत्सवात करणार भारताचे प्रतिनिधित्व

पुणे : अत्यंत गुणी आणि आश्वासक अवघ्या आठ वर्षाची संगीतकार लिशा विवेक मतकर हिने आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करण्याची मानाची संधी मिळवली आहे. नोव्हेंबर २०२६ मध्ये व्हिएतनाम येथे होणाऱ्या इंटरनॅशनल म्युझिक फेस्टमध्ये तिची निवड झाली आहे.ती या महोत्सवात भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे .

लिशाने  भारत उत्सव २०२६ या स्पर्धेत. सोलो परफॉर्मन्समध्ये प्रथम क्रमांक मिळवत आपल्या संगीत प्रवासात महत्त्वाचे यश मिळवले. तसेच तिने ऑर्केस्ट्रा गटामध्ये ड्रम वादनाचे कौशल्य सादर केले. या गट सादरीकरणालाही द्वितीय क्रमांक मिळाला.

ही आठवडाभर चालणारी स्पर्धा अखिल लोककला कल्चरल ऑर्गनायझेशन (ALCO) यांच्या वतीने आयोजित करण्यात आली होती. देशभरातील अनेक गुणी कलाकारांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. उदयोन्मुख कलाकारांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संधी देण्यासाठी ही संस्था ओळखली जाते.

लिशाच्या या यशामागे तिची मेहनत, संगीतावरील प्रेम आणि सातत्यपूर्ण सराव महत्त्वाचा ठरला आहे. तिच्या यशात तिच्या गुरूंचे मार्गदर्शन आणि प्रशिक्षण यांचाही मोठा वाटा असल्याचे मानले जात आहे.

लिशाच्या या उल्लेखनीय यशाबद्दल तिच्या कुटुंबीयांनी, मित्रपरिवाराने आणि सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांनी तिचे अभिनंदन करून व्हिएतनाममधील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

थोडे नवीन जरा जुने