!-- afp header code starts here --> स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाच्या रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाच्या रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

 


४३ व्या वर्धापनदिनानिमित्त व सावरकर जयंतीनिमित्त सामाजिक बांधिलकीचा प्रेरणादायी उपक्रम

वार्ताहर : शिवानंद चौगुले | महाराष्ट्र जनभूमी न्यूज

पिंपरी चिंचवड : निगडी प्राधिकरण येथील स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाच्या वतीने मंडळाच्या ४३ व्या वर्धापनदिनानिमित्त तसेच स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेले भव्य रक्तदान शिबिर रविवारी अत्यंत उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाले. “राष्ट्रभक्ती • राष्ट्रनिष्ठा • राष्ट्रसेवा” हा संदेश देत समाजहितासाठी आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाला नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद दिला.

सेक्टर २५ प्राधिकरण, निगडी येथील स्वातंत्र्यवीर सावरकर सदनमधील कॅप्टन जी. एस. कदम सभागृह येथे आयोजित या शिबिरात युवक, सामाजिक कार्यकर्ते, महिला तसेच विविध क्षेत्रातील नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेत रक्तदान केले. “एक थेंब रक्ताचा… फुलवितो अंकुर जीवनाचा…!” हा संदेश प्रत्यक्ष कृतीतून साकारत अनेक रक्तदात्यांनी समाजाप्रती आपली जबाबदारी पार पाडली.

या रक्तदान शिबिराचे आयोजन जनकल्याण रक्तपेढी, पुणे यांच्या सहकार्याने करण्यात आले होते. जनकल्याण रक्तपेढीच्या अधिकृत पत्रानुसार या शिबिरात एकूण ३३ रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक कार्यात मोलाचा सहभाग नोंदविला. रक्तदात्यांच्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल जनकल्याण रक्तपेढीच्या वतीने स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाचे विशेष आभार मानण्यात आले असून मंडळाला गौरवपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.


स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या विचारांना अभिवादन करत “जयंती साजरी करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे समाजासाठी केलेली निःस्वार्थ सेवा” हा संदेश या उपक्रमातून अधोरेखित करण्यात आला. रक्तदानासारख्या जीवनदायी कार्यातून समाजामध्ये मानवतेचा आणि राष्ट्रसेवेचा संदेश देण्याचे कार्य स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ सातत्याने करत असल्याचे यावेळी उपस्थितांनी सांगितले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मंडळाचे पदाधिकारी, स्वयंसेवक, कार्यकर्ते तसेच रक्तदाते यांचे सर्व स्तरातून कौतुक होत असून भविष्यातही असे सामाजिक उपक्रम अधिक व्यापक स्वरूपात राबविण्याचा संकल्प आयोजकांनी व्यक्त केला.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंती दिवशी गुरुवार दिनांक २८ मे २०२६ रोजी सायंकाळी स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळात विविध संस्कृती कार्यक्रम चे आयोजन केल्याचे कार्याध्यक्ष श्री रमेश बानगोंडे यांनी सांगितले.

थोडे नवीन जरा जुने