MGID Header Code
Code End

विषारी दारू : 10 जणांच्या दुर्दैव मृत्यूला पोलीस प्रशासन जबाबदार, आप चा आरोप


पिंपरी चिंचवड: दापोडी-फुगेवाडी येथे विषारी हातभट्टीची दारू पिऊन 10 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. आमच्या पार्टीने 05 मे 2026 रोजी पोलीस आयुक्तालयाकडे लेखी निवेदन दिले होते की, हातभट्टी दारूचे अड्डे बंद करण्यात यावे, परंतु त्यावर काहीही कार्यवाही झाली नाही. ती जर झाली असती तर आज हे 10 कुटुंब रस्त्यावरती आले नसते. पोलीस आयुक्तांनी आम्ही दिलेल्या निवेदनाची दखल का घेतली गेली नाही याची चौकशी करून जे अधिकारी जबाबदार आहेत त्यांच्यावर कार्यवाही करून त्यांना बडतर्फ करावे.

महाराष्ट्राचा पुरता युपी बिहार होत चालला आहे ह्याला सत्ताधारी पक्ष जवाबदार आहे.आमची मागणी आहे की, मृतांच्या कुटुंबीयांना 25 लाखाची मदत तात्काळ सरकारने जाहीर करावी व पिंपरी चिंचवड मधील सर्व अवैध धंदे बंद करावे.



थोडे नवीन जरा जुने