MGID Header Code
Code End

पिंपरी चिंचवड येथील प्रभाग क्र ११मधील अवैध धंदे बंद करुन कायदेशीर कारवाई करण्यात यावी -सामाजिक कार्यकर्ते मारुती जाधव यांची मागणी

 


पिंपरी चिंचवड :  पिंपरी चिंचवड शहरातील दापोडी आणि फुगेवाडी परिसरात गुरुवार दिनांक 28 मे रोजी एकाच दिवशी आठ नागरिकांचा झालेला संशय मृत्यू अत्यंत धक्कादायक गंभीर आणि वेदनादायी आहे. त्या अनुषंगाने पिंपरी-चिंचवड शहरातील प्रभाग क्रमांक 11 मधील कृष्णानगर परिसरात सुरू असलेल्या अवैध बार व वाईन शॉप मुळे नागरिक त्रस्त झाले असून यावर तात्काळ कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सामाजिक कार्यकर्ते मारुती गणपत जाधव यांनी पोलीस प्रशासनाला निवेदन देत सांगितले की, कृष्णानगर, अजंठा नगर घरकुल, भीमशक्ती नगर,महात्मा फुले नगर,हरगुडे वस्ती परिसरात काही ठिकाणी रात्री उशिरापर्यंत अवैध व्यवसाय सुरू असून त्यामुळे परिसरातील महिला, ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, तसेच काही ठिकाणी संशयास्पद हालचाली वाढल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

मारुती जाधव यांनी संबंधित अवैध व्यवसायांवर तातडीने छापेमार कारवाई करून ते बंद करावेत, तसेच संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी केली आहे.

 कृष्णा नगर चौकात असणारे भिशे वाईन शॉप या ठिकाणाहून जाणारे येणाऱ्या महिलांना बरेच वर्षांपासून त्रास सहन करावा लागत आहे बऱ्याच वेळा त्या ठिकाणी मोठ्या आवाजात शिवीगाळ करणे मारामाऱ्या करणे या अगोदर त्या ठिकाणी खुनासारखे घटना देखील घडलेले आहे कृष्णा नगर चौकातील विषय वाईन शॉप वर तात्काळ कारवाई करून इतरत्र हलवावे. अन्यथा नागरिकांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

थोडे नवीन जरा जुने