MGID Header Code
Code End

साक्षरता वर्गाच्या निमित्ताने वाडी वस्तीवर पोहचला सौर पथदिव्याचा उजेड

 


आळंदी (अर्जुन मेदनकर) : उर्मी संस्थेच्या माधमातून खेड आणि मावळ तालुक्यातील गाव व वाडी वस्तीवर साक्षरता वर्ग चालविले जातात. हे वर्ग मुख्यता रात्रीच्या वेळी भरतात. अनेक वाडी वस्तीवर विजेचा प्रश्न असल्याने वर्गाला येणाऱ्या लोकांना वर्गाच्या ठिकाणी उजेड नसल्याने अडचण येऊन गैरसोय होत होती.

 वर्ग सुरळीत चालण्यासाठी त्या ठिकाणी ऊर्मी संस्थेच्या वतीने तसेच स्थानिक ग्रामस्थांच्या सहभागाने सौर पथदिवे बसवण्यात आले. खेड मधील कोये आणि कुरकुंडी गावातील ठाकर वस्तीवर संस्थे कडून सौर दिवे उपलब्ध करून देऊन बसविण्यात आले. ग्रामस्थांनी हे दिवे खांब उभारून त्यावर दिवे बसवण्याचे काम केले. रात्रीच्या वेळी उजेडासाठी या दिव्याचा उपयोग ग्रामस्थांना होत आहे. या उजेडात आता रात्रीचे वर्ग भरत आहेत. 

या साठी कुरकुंडी येथील मायाताई जावळे, कोये येथील हौसाताई डांगले यांनी विशेष पुढाकार घेतला. या उपक्रमाचे परिसरातून कौतुक होत आहे. या मुळे साक्षरता वर्गात उपस्थिती वाढून गैरसोय दूर झाली आहे.

थोडे नवीन जरा जुने