!-- afp header code starts here --> अमृतमहोत्सवी अभिष्टचिंतन सोहळ्यात ज्येष्ठांच्या अनुभवांचा गौरव

अमृतमहोत्सवी अभिष्टचिंतन सोहळ्यात ज्येष्ठांच्या अनुभवांचा गौरव

Honouring the experiences of seniors at the Amrut Mahotsav felicitation ceremony.


पिंपरी-चिंचवड (शिवानंद चौगुले) : ओम शांती गंगा ज्येष्ठ नागरिक संघाच्या विरंगुळा केंद्रात, सिद्धार्थ गौतम बुद्ध उद्यान येथे संघाचे ज्येष्ठ मार्गदर्शक, प्रथम सचिव तथा सर्वांचे लाडके व्यक्तिमत्त्व श्री. राधाकिसन चौधरी यांच्या अमृतमहोत्सवी अभिष्टचिंतन सोहळ्याचे उत्साहपूर्ण व भावनिक वातावरणात आयोजन करण्यात आले.

श्री. चौधरी यांच्या आगमनावेळी उपस्थित नातेवाईक, मित्रपरिवार आणि ज्येष्ठ सदस्यांनी औक्षण, पुष्पवर्षाव आणि टाळ्यांच्या गजरात त्यांचे स्वागत केले. शासकीय सेवेत असताना आदिवासी भागात कार्यरत राहून अनेक गरजूंना मदतीचा हात देणारे तसेच सेवानिवृत्तीनंतरही समाजातील प्रत्येकाशी आत्मीयतेने संवाद साधत सकारात्मकतेचा संदेश देणारे श्री. राधाकिसन चौधरी हे समाजासाठी प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व असल्याचे यावेळी वक्त्यांनी सांगितले.

चौधरी परिवाराने प्रेम, विश्वास आणि संस्कारांच्या बळावर एकत्र कुटुंबपद्धती जपत समाजापुढे आदर्श निर्माण केला आहे. वयोमानानुसार विविध शारीरिक व्याधींना सामोरे जात असतानाही आत्मविश्वास, जिद्द आणि सकारात्मक दृष्टिकोन कायम ठेवून त्यांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी आदर्श निर्माण केला असल्याचे मान्यवरांनी नमूद केले.

यावेळी यशवंत कन्हेरे, शिवानंद चौगुले, मधुकर धकाते, रामदास चौधरी, मंगेश चौधरी आणि सुनंदा मुंडे यांनी श्री. राधाकिसन चौधरी यांना शुभेच्छा देत त्यांच्या सहवासातील आठवणींना उजाळा देणारी मनोगते व्यक्त केली.

गप्पा, गीत, हास्य आणि स्नेहपूर्ण वातावरणात पार पडलेल्या या सोहळ्याची सांगता स्नेहभोजनाने झाली. उपस्थितांनी श्री. राधाकिसन चौधरी यांना निरोगी, आनंदी व दीर्घायुष्य लाभावे, अशा सदिच्छा व्यक्त केल्या.

थोडे नवीन जरा जुने