!-- afp header code starts here --> शिवसेना पक्षाच्या वतीने चेतन गौतम बेंद्रे यांची पिंपरी-चिंचवड शहर प्रवक्तेपदी नियुक्ती

शिवसेना पक्षाच्या वतीने चेतन गौतम बेंद्रे यांची पिंपरी-चिंचवड शहर प्रवक्तेपदी नियुक्ती

पिंपरी-चिंचवड : शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन तसेच शिवसेना मुख्य नेते तथा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार आणि महासंसदरत्न खासदार श्री. श्रीरंग उर्फ आप्पा बारणे यांच्या मार्गदर्शनाखाली युवा सेना शहरप्रमुख (पिंपरी-चिंचवड) चेतन गौतम बेंद्रे यांची शिवसेना पिंपरी-चिंचवड शहर प्रवक्ता या महत्त्वाच्या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

चेतन बेंद्रे हे सामाजिक, शैक्षणिक आणि जनहिताच्या विविध उपक्रमांमध्ये सातत्याने सक्रिय असून, त्यांच्या कार्याची दखल घेत पक्षाने त्यांच्यावर ही महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपविली आहे.

शिवसेनेची भूमिका प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचवणे, पक्ष संघटना अधिक सक्षम करणे तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी ते प्रभावीपणे कार्य करतील, असा विश्वास खासदार श्री. श्रीरंग उर्फ आप्पा बारणे यांनी व्यक्त केला आहे.

यावेळी चेतन बेंद्रे यांनी पक्ष नेतृत्वाचे मनःपूर्वक आभार मानत, शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा प्रचार-प्रसार करत पक्षवाढीसाठी पूर्ण ताकदीने कार्य करण्याची ग्वाही दिली.

यावेळी महासंसदरत्न खासदार श्री. श्रीरंग उर्फ आप्पा बारणे, उपनेत्या तथा नगरसेविका सौ. सुलभा उबाळे, युवा सेना सचिव तथा नगरसेवक श्री. विश्वजीत बारणे, जिल्हाप्रमुख श्री. राजेश खांडभोर, युवा सेना मावळ लोकसभा प्रमुख श्री. राजेंद्र तरस, श्री. बापू कातळे तसेच युवा सेना जिल्हाप्रमुख श्री. सागर पाचर्णे, महानगर प्रमुख श्री  राजेश फलके उपस्थित होते.

थोडे नवीन जरा जुने