प्रिय मित्रहो,
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सामाजिक न्याय आणि विचारमंथन अभ्यास शिबीर दि. ३-४-५ जुलै २०२६ या कालावधीत कवठेमहांकाळ जि. सांगली येथे आयोजित केले आहे. कवठेमहांकाळ येथील शाही दरबार या हाॅलमध्ये हे शिबीर होत असुन महाराष्ट्रातील निवडक तीनशे कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.
शिबिरामध्ये दलित, आदिवासी, अल्पसंख्यांक व महिला प्रश्नाबाबत तसेच वारकरी संप्रदाय, मराठी भाषा व धर्मांधते बाबत सत्रे ठेवण्यात आलेली असून यामध्ये वृंदा कारत, डॉ. आनंद तेलतुंबडे, सेहबा फारुकी, श्यामसुंदर महाराज सोन्नार, दीपक पवार व डॉ. अशोक ढवळे हे वक्ते असतील.
या अभ्यासशिबीरासाठी साधारण तीन ते चार लाख खर्च अपेक्षित आहे. आम्ही आपणास विनंती करीत आहोत की, आपण नेहमीच आम्ही करीत असलेल्या चळवळीस मदत करीत आलेले अहात. आजही आम्ही या सामाजिक न्याय आणि विचारमंथन अभ्यास शिबीरासाठी मदतीची अपेक्षा करीत आहोत. ती मदत ज्या स्वरुपात द्याल त्या स्वरुपात आम्ही स्विकारु.
धन्यवाद!
आपले विश्वासु,
उमेश देशमुख, रेहाना शेख
आमचा अकौंट नंबर आणि गुगल पे आणि फोन पे नंबर पुढे देत आहोत.
COMMUNIST PARTY OF INDIA(MARXIST) SANGLI DIST. COMMITEE
A/C NO - 0418000100063669*
IFSC - PUNB0041800
MICR CODE- 4160S24151
फोन पे- ९४२२६१४८२३
