!-- afp header code starts here --> उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची आळंदी मंदिरास सदिच्छा भेट

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची आळंदी मंदिरास सदिच्छा भेट

 


आळंदीत श्रींचे समाधीची पूजा दर्शन 

देवस्थान गोशाळेस एक कोटी निधीसाठी देवस्थानचे निवेदन 

आळंदी (अर्जुन मेदनकर) : महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्राताई अजितदादा पवार यांनी श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिरास सदिच्छा भेट देऊन श्रींचे संजीवन समाधीची पूजा करून दर्शन घेतले. यावेळी आळंदी देवस्थान तर्फे गोशाळेसाठी १ कोटी रुपये निधी मिळावा अशी मागणी करण्यात आली आहे.  

   या वेळी मंदिर प्रदक्षिणा करीत त्यांनी आळंदी देवस्थान, आळंदी नगरपरिषद, राष्ट्रवादी काँगेस पार्टीचे पदाधिकारी यांचेसह स्थानिक नागरिकांशी संवाद साधला. नागरिकांनी विविध समस्यां अडीअडचणी या संदर्भात निवेदनांचा वर्षाव करीत आळंदी पंचक्रोशीतील समस्यां थेट उपमुख्यमंत्री सुनेत्रा ताई पवार यांचे कडे निवेदनाद्वारे मांडल्या. या वेळी त्यांनी हि समस्यां, अडचणी, विविध विकास कामे या बाबत माहिती जाणून घेत संवाद साधला. 

   या प्रसंगी माजी मंत्री, आमदार दिलीप वळसे पाटील, माजी आमदार दिलीप मोहिते पाटील, आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त भावार्थ देखणे, विश्वस्त योगी निरंजन नाथसाहेब, चैतन्य महाराज लोंढे, पुरुषोत्तम महाराज पाटील, रोहिणी पवार, व्यवस्थापक माऊली वीर, नगराध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे, उपाध्यक्ष सुजाता तापकीर, राष्ट्रवादी काँग्रेस चे माजी नगरसेवक डी.डी. भोसले पाटील, उद्योजक प्रकाश कुऱ्हाडे पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसच्या जेष्ठ नेत्या पुष्पाताई कुऱ्हाडे, रुपाली पानसरे, नगरसेविका अर्चना तापकीर, उज्ज्वला काळे, मुख्याधिकारी माधव खांडेकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमा नरके आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी श्रींचे पालखी रथाचे बैलजोडीची पूजा त्यांनी केली. या प्रसंगी तुळशीराम रानवडे, सौरभ गव्हाणे, ग्रामपंचायत सदस्य अनिकेत कुऱ्हाडे आदी उपस्थित होते.   

   या वेळी आळंदीसह परिसरातील नागरिक, पदाधिकारी यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांचे कडे नागरिकांनी निवेदने देण्यासाठी धावपळ करीत निवेदनांचा वर्षाव करीत निवेदन देत संवाद संवाद साधला. निवेदने देण्यास माऊली मंदिरातील कारंजा मंडपात नागरिकांची झुंबड उडाली. यात आळंदी देवस्थान, आळंदी नगरपरिषद, इंद्रायणी सेवा फौंडेशन सह नागरिक, पदाधिकारी यांचा देखील समावेश होता. आळंदी, रासे येथील कार्यक्रमास जाताना त्यांनी आळंदी मंदिरास भेट देऊन श्रींचे दर्शन घेतले. या वेळी त्यांनी मंदिरासह आळंदीतील विविध समस्यां जाणून घेत निवेदने स्वीकारत संवाद साधला.

   आळंदी नगरपरिषद नगराध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे, उपनगराध्यक्षा सुजाता तापकीर, राष्टवादी काँग्रेस तर्फे पुष्पाताई कुऱ्हाडे, रुपाली पानसरे, अर्चना तापकीर, उज्ज्वला काळे, आळंदी देवस्थान सह उपस्थित विविध सेवाभावी संस्था, पदाधिकारी यांचे हस्ते त्यांचा सत्कार हरिनाम गजरात करण्यात आला. आळंदी देवस्थानने एक कोटी रुपये निधी गोशाळेस देण्याची मागणी यावेळी केली असल्याची माहिती व्यवस्थापक माऊली वीर यांनी दिली.

थोडे नवीन जरा जुने