!-- afp header code starts here --> निर्जला एकादशी दिनी घाटावर इंद्रायणी आरती हरिनाम गजरात

निर्जला एकादशी दिनी घाटावर इंद्रायणी आरती हरिनाम गजरात

 


माऊली मंदिरात भाविकांची दर्शनास गर्दी 

आळंदी (अर्जुन मेदनकर) : येथील इंद्रायणी नदी घाटावर  इंद्रायणी आरती सेवा समितीचे वतीने इंद्रायणी नदी घाटावर इंद्रायणी आरती हरिनाम गजरात झाली. तत्पूर्वी महिला साधकांनी घाट स्वच्छता करीत सामाजिक बांधिलकी जोपासली. माऊली मंदिरात परंपरेने निर्जला एकादशी विविध धार्मिक कार्यक्रमांनी हरिनाम गजरात साजरी झाली. माऊली मंदिरातील श्रींचे गाभाऱ्यात लक्षवेधी पुष्प सजावट करण्यात आली होती. श्रींचे दर्शनास भाविकांची गर्दी झाली होती.   

  मंदिरात निर्जला एकादशी दिनी हरिनामाचा जयघोष उत्साहात झाला. मंदिर प्राकारात भाविकांनी पारायण करीत भक्तिभाव जोपासला. मारुतीबुवा गुरव यांचे पुण्यतिथी निमित्त मंदिरात अखंड हरिनाम सप्ताह सुरु असून भाविकांना धार्मिक पर्वणी लाभली असल्याचे संयोजक संकेत वाघमारे आळंदीकर यांनी सांगितले. इंद्रायणी आरती सेवा समिती तर्फे दर एकादशीला होणारी इंद्रायणी आरती उत्साहात झाली. घाटावर उपवासाचे पदार्थासह केळीचे वाटप भाविकांना आरती नंतर झाले. घाटावर भाविकांनी गर्दी करून आरती केली. 

  या प्रसंगी इंद्रायणी आरती संयोजक अनिता झुजम, सुवर्णाताई काळे, संयोजक अर्जुन मेदनकर, सरस्वती भागवत, सुरेखा काळभोर, काशीबाई अडकिने, केसरबाई कदम,  अस्मिता गौर, भागीरथी भागवत,  वृंदावनी सोळंके, मनीषा दापके, तारामती गौर,  सावित्री घुंडरे, मुद्राका कुडके, अनिता शिंदे, विमल मुसळे, बायडा थोरवे, गोविंद ठाकूर, माऊली घुंडरे, सुयश कदम, गजानन गांडेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

थोडे नवीन जरा जुने