!-- afp header code starts here --> बालभारतीची पाठ्यपुस्तकातील माहिती दुरुस्त; सावित्रीबाई फुले यांच्या शाळेबाबत सुधारणा

बालभारतीची पाठ्यपुस्तकातील माहिती दुरुस्त; सावित्रीबाई फुले यांच्या शाळेबाबत सुधारणा

Information in Balbharati textbook corrected; revision made regarding Savitribai Phule's school.


पुणे (वर्षा चव्हाण) : महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ (बालभारती), पुणे यांनी इयत्ता तिसरीच्या ‘आपल्या सभोवतालचे जग – भाग २’ या पाठ्यपुस्तकातील एका माहितीबाबत अधिकृत शुद्धीपत्रक जारी केले आहे.

बालभारतीच्या प्रसिद्धीपत्रकानुसार, पाठ्यपुस्तकाच्या पृष्ठ क्रमांक 15 वरील ‘माहित आहे का तुम्हाला?’ या चौकटीत नमूद करण्यात आलेले “ही महाराष्ट्रातील पहिली मुलींची शाळा होय” हे वाक्य दुरुस्त करण्यात आले आहे.

याऐवजी “ही महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतातील पहिली मुलींची शाळा होय. ही भारतीयांनी मुलींसाठी स्थापन केलेली पहिलीच शाळा होय.” असा सुधारित मजकूर समाविष्ट करण्यात येणार असल्याचे शुद्धीपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.


या संदर्भात विविध वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या तसेच ई-मेलद्वारे प्राप्त झालेल्या निवेदनांची दखल घेऊन ही दुरुस्ती करण्यात आल्याचे बालभारतीने म्हटले आहे. संबंधित शुद्धीपत्रक बालभारतीच्या संकेतस्थळावरही उपलब्ध करून देण्यात आले आहे.

सदर प्रसिद्धीपत्रकावर पाठ्यपुस्तक मंडळाच्या संचालक अनुराधा ओक यांची स्वाक्षरी असून, शाळा व शिक्षकांनी सुधारित माहितीची नोंद घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.


थोडे नवीन जरा जुने