!-- afp header code starts here --> आम आदमी पार्टीच्या पुढाकारातून मोफत फिजिओथेरपी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

आम आदमी पार्टीच्या पुढाकारातून मोफत फिजिओथेरपी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद


पिंपरी-चिंचवड : आम आदमी पार्टी, पिंपरी-चिंचवड शहर क्रीडा आघाडीच्या वतीने नागरिकांसाठी मोफत फिजिओथेरपी तपासणी व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. काळेवाडी येथील श्री फिट केअर अँड क्युअर (SFCC) फिजिओथेरपी सेंटर येथे पार पडलेल्या या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सकाळी ९ ते रात्री ८ वाजेपर्यंत चाललेल्या या शिबिरात सुमारे ३५० ते ४०० नागरिकांनी सहभाग घेत मोफत तपासणी व उपचारांचा लाभ घेतला.

शिबिराचे उद्घाटन सामाजिक कार्यकर्ते मल्हारी वाघे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी निरोगी समाज घडविण्यासाठी अशा आरोग्यविषयक उपक्रमांची गरज असल्याचे सांगितले. क्रीडा आघाडीचे शहराध्यक्ष विजय चांडल यांनी पाठदुखी, गुडघेदुखी, सांधेदुखी, खेळातील दुखापती आणि पुनर्वसनाशी संबंधित समस्यांनी त्रस्त असलेल्या नागरिकांसाठी हे शिबिर आयोजित करण्यात आल्याचे सांगितले.

या शिबिरात फिजिओथेरपी क्षेत्रातील २१ वर्षांचा अनुभव असलेले डॉ. मुकेश व्यास यांनी नागरिकांची तपासणी करून मार्गदर्शन केले. पाठदुखी, स्नायू व सांध्यांचे विकार, खेळातील दुखापती, पुनर्वसन उपचार तसेच प्रतिबंधात्मक फिजिओथेरपी याविषयी त्यांनी सविस्तर माहिती दिली.


कार्यक्रमास आम आदमी पार्टीचे पदाधिकारी सचिन थोरात, प्रकाश हगवणे, अकिल शेख, इम्रान खान, लक्ष्मण माने, अजय सिंग, यशवंत कांबळे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. शिबिराच्या समारोपप्रसंगी आम आदमी पार्टीचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष वैजनाथ शिरसाट यांच्या हस्ते सहभागी डॉक्टरांचा गौरव प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.

या उपक्रमाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाल्याने भविष्यातही आरोग्यविषयक उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले. नागरिकांच्या आरोग्य संवर्धनासाठी आयोजित करण्यात आलेले हे शिबिर यशस्वीरीत्या पार पडले.

थोडे नवीन जरा जुने