!-- afp header code starts here --> पत्रकारांना धमकी देणाऱ्या खा. संजय दिना पाटील यांचा MNS ने केला जाहीर निषेध

पत्रकारांना धमकी देणाऱ्या खा. संजय दिना पाटील यांचा MNS ने केला जाहीर निषेध

 


शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटातून शिंदे गटात प्रवेश केलेले खासदार श्री. संजय दिना पाटील यांनी पत्रकारांविषयी केलेल्या अवमानकारक व धमकीवजा वक्तव्याप्रकरणी कायदेशीर कारवाई करावी,तसेच या घटनेचा महाराष्ट्र निर्माण सेनेने निषेध करून पोलिस आयुक्त यांना निवेदन दिले आहे.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटातून शिंदे गटात प्रवेश केलेले खासदार श्री. संजय दिना पाटील यांनी नुकतेच पत्रकार बांधवांविषयी अत्यंत अवमानकारक, उद्धट व धमकीवजा वक्तव्य केले आहे. याचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना जाहीर निषेध करीत आहे.

लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या प्रसारमाध्यमांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न श्री. संजय दिना पाटील यांनी केला आहे. पत्रकारांना शिवीगाळ करणे तसेच "मारून टाकण्याची" भाषा वापरणे हे अत्यंत गंभीर असून लोकशाहीला काळिमा फासणारे आहे.

अशा प्रकारची भाषा वापरणे व धमकी देणे हे भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांनुसार दखलपात्र गुन्हा आहे. तरी श्री. संजय दिना पाटील यांच्यावर तात्काळ गुन्हा नोंद करून कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आम्ही मागणी करीत आहोत.

पत्रकारांना अश्लाघ्य भाषेत बोलणे व त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्याच्या या प्रकाराचा आम्ही पुन्हा एकदा तीव्र निषेध करतो. याबाबत पोलिस आयुक्त पिंपरी चिंचवड यांना सचिन चिखले यांनी निवेदन दिले आहे.

शहराध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, पिंपरी चिंचवड  


थोडे नवीन जरा जुने