पिंपरी चिंचवड : ५ जून रोजी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त भाजप महाराष्ट्र प्रदेश वरून आलेल्या सूचनेनुसार भारतीय जनता पार्टी शहराध्यक्ष शत्रुघ्न बापू काटे यांच्या पुढाकाराने पिंपरी चिंचवड शहरात एक लाख वृक्षारोपण करण्याचं नियोजन भारतीय जनता पार्टी पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने करण्यात आले आहे
भारतीय जनता पार्टी जिल्हा महामंत्री मधुकर बच्चे हे या अभियानाचे जिल्हा संयोजक आहे तर सहसंयोजक म्हणून मनोज तोरडमल व रमेश वहिले यांना जबाबदारी दिली आहे
खासदार प्रा. मेघाताई कुलकर्णी यांना या अभियानाची पश्चिम महाराष्ट्र संयोजक म्हणून प्रदेशाने जबाबदारी दिलेली आहे
५ जून रोजी सकाळी सात ७ वाजता या वृक्षारोपणाची सुरुवात दुर्गा टेकडी येथे एक हजार वृक्षारोपण करून ,संपूर्ण दिवसभरात चिंचवड, पिंपरी, भोसरी अशा तीनही विधानसभेमधील १४ मंडले ते बूथ स्तरापर्यंत वृक्षारोपण होणार आहे
या अभियानात भाजपा शहराध्यक्ष नगरसेवक शत्रुघ्न बापू काटे,
चिंचवड विधानसभेचे आमदार शंकर भाऊ जगताप ,आमदार महेश दादा लांडगे, आमदार उमाताई खापरे ,आमदार अमित जी गोरखे, महापौर रवी भाऊ लांडगे, उपमहापौर शर्मिलाताई बाबर, पक्षनेते प्रशांत शितोळे, स्थायी समिती अध्यक्ष अभिषेक बारणे हे अनेक ठिकाणी स्वतः वृक्षारोपण करून अन्य ठिकाणी प्रमुख म्हणून उपस्थित राहणार आहेत.
सर्व मंडल अध्यक्ष,नगरसेवक, नगरसेविका, माजी नगरसेवक, पक्षाचे वरिष्ठ नेते, शक्ती प्रमुख, बूथ प्रमुख सर्व जिल्हा पदाधिकारी कार्यकर्ते स्वतः आपल्या बूथ वर वृक्षारोपण करून जनसहभागातून तसेच सामाजिक संस्था,मंडळे यांनाही सहभागी घेऊन ५ जून रोजी पहिल्याच दिवशी किमान १५००० वृक्षारोपण करण्याचे नियोजन केले आहे तसेच पुढील पंधरा दिवसात संपूर्ण शहरात एक लाखाहून अधिक वृक्षारोपण करण्याची नियोजन केलेले आहे
त्यासोबत नदी स्वच्छता, प्लास्टिक पर्यावरण जनजागृती विविध ठिकाणी स्वच्छता अभियान हे या अभियानात राबवले जाणार आहे
पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांनाही या अभियानात सहभाग घ्यावा व वृक्षारोपण करून त्याच्या संगोपनाचे नियोजनही करावे असे आवाहन शहराध्यक्ष शत्रुघ्न बापु काटे व
जागतिक पर्यावरण दिन अभियान जिल्हा संयोजक मधुकर बच्चे यांनी केले आहे
