पिंपरी चिंचवड : संत तुकोबाराय संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या काळापासून अतिशय माफक प्रमाणामध्ये पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांच्या संख्येत प्रचंड प्रमाणामध्ये वाढ झालेली आहे. या वारकरी संप्रदायाच्या आनंदी आणि भक्तिमय आशा साधनेच्या काळात आळंदी आणि देहू येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्याच्या कान्या कोपऱ्यातून वारकरी येत असतात. या वारकऱ्यांच्या समूहात मूळ वारकरी च्या बरोबरीने हौसे नव्हसे आणि गवसे असे सर्व प्रकारचे लोक यामध्ये सामावलेली असतात. परंतु वारी चालणाऱ्या या सर्वांना वैष्णव म्हणून मानले जाते आणि प्रत्येक गोष्ट हा पूजक म्हणून मानला जातो. म्हणून वारकऱ्यांची सेवा करणारे अनेक समूह अनेक संघटना अनेक संस्था या वैष्णवांच्या सेवेसाठी या काळामध्ये तत्पर असतात. प्रत्येकाची सेवा वेगवेगळी असते सेवा करण्याचे माध्यम वेगळ असतं सेवा करण्याची पद्धत वेगळी असते. कुणी अन्नदान करतात, वस्तू दान करतात तर कुणी अर्थ दान करतात.
या वारीच्या दरम्यान वारीत स्वच्छता रहावी, वारकऱ्यांचे आरोग्य उत्तम राहावे वारकऱ्यांची सुरक्षितता राहावी यासाठी महाराष्ट्र शासन देखील कसोशीने प्रयत्न करत असते. अशा या भक्तीमय सोहळ्यात जाताना प्रत्येक वारकऱ्याने आपली जबाबदारी ओळखून वागायचे असते. यात स्वच्छतेचा मान राखला गेला पाहिजे पर्यावरणाचा मान राखला गेला पाहिजे रस्ता सुरक्षिततेचा मान राखला गेला पाहिजे. यासाठी झोपण्याच्या व्यवस्थेबरोबर आपल्याबरोबर आपलं स्वतःचं ताट एक ग्लास आणि आपल्या जवळील एक पाण्याची बाटली या गोष्टी असणे आवश्यक आहे. जेथे कोठे नाश्ता जेवण करावयाच्या असल्यास आपण आपल्या ताटातच घ्यावे आणि खावे आणि ताट स्वच्छ करून आपल्याजवळ ठेवावे. यामुळे ही कृती छोटीशी जरी असली तरी याचे परिणाम अतिशय मोठ्या प्रमाणावर आपल्याला बघायला मिळतात. पत्रवाळी पेपर प्लेट यासारख्या वस्तूंचा वापर नियंत्रित होऊन कचरा होणार नाही. ते नष्ट करताना पर्यावर्णावर फार मोठा परिणाम होतो तो होणार नाही. चहा सरबत तत्सम पेय ज्या ठिकाणी आपल्याला मिळेल त्या ठिकाणी आपण आपल्या जवळील असलेल्या ग्लासमध्ये आपण ते घेऊन प्यायचे आहे म्हणजे थर्माकोल ग्लास पेपर ग्लास अथवा युज अँड थ्रो म्हणून वापरल्या जाणाऱ्या साहित्याचा वापर शून्य होईल अथवा कमी होईल. यासाठी आपल्याला वारी चालताना कोणतेही अधिक कष्ट द्यावे लागणार नाहीत आपले ताट ग्लास व पाण्याची बाटली आपल्या जवळ शबनम मध्ये असावी. आपण या गोष्टी काटेकोरपणे पाहिल्यास वारी मार्गावर कुठेही घाण होणार नाही.
लेखाच्या सुरुवातीलाच म्हटलेले आहे वारीत हौसे नव्हे गवसे सर्वच असतात त्यामुळे वारीच्या रस्त्यावर बरेच लोक सिगारेट तसेच काही मा भाग गांजा आओढणारे देखील असतात. आशा व्यसनी लोकांनी आपले हे व्यसन किमान वारीच्या काळात तरी करू नये म्हणजे वारी मार्गावर त्या धुराचा होणारा त्रास होणार नाही. या अतिशय साध्या सोप्या आणि सहज पाडल्या जाणाऱ्या गोष्टी आपण जर वारीकाळात पाळल्या तर निश्चितच वारी मार्ग स्वच्छ सुंदर भक्तीमय आणि आनंदी असं होईल म्हणून *मी वारकरी पण माझी काही जबाबदारी*अशा रीतीने आपण वारीत गेल्यास निश्चित निर्मल वारी होऊन त्या भगवंताची खऱ्या अर्थी साधना होईल वारीतील हेतू जीवा शिवाची भेट होणे हे साध्य होईल
ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम
यशवंत कण्हेरे
अध्यक्ष कर्मयोगी संत गाडगेबाबा जागृती मंच
९७६७८४६०
