पिंपरी चिंचवड (सलीम सय्यद) : चिंचवड गावातील वस्ताद विठोबा जलतरण तलावात पोहणाऱ्यांना आधार मिळावा यासाठी मागील पंधरा दिवसांपूर्वी संरक्षक लोखंडी बार बसविण्यात आले होते. हे काम प्रशासनाने सुमारे साडेतीन लाख रुपये खर्च करून ठेकेदारामार्फत करून घेतल्याचे समजते.
मात्र, काम पूर्ण झाल्यानंतर अवघ्या एका आठवड्यात सर्व लोखंडी बार निघून आले आहेत. त्यामुळे या कामाच्या दर्जाबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. सर्वसामान्य नागरिकांच्या करातून मिळालेल्या निधीतून हे काम करण्यात आले असताना एवढा खर्च करूनही त्याचा कोणताही उपयोग झालेला दिसत नाही.
या निकृष्ट दर्जाच्या कामाची प्रशासनाने तात्काळ दखल घेणे आवश्यक आहे. संबंधित ठेकेदाराकडून सदर काम पुन्हा करून घेण्यात यावे. तसेच कामाची पाहणी करून त्यास मंजुरी देणाऱ्या संबंधित अधिकाऱ्याचीही चौकशी करण्यात यावी.
जर ठेकेदाराने कामाची दुरुस्ती अथवा पुनर्बांधणी करण्यास नकार दिला, तर जबाबदारी निश्चित करून संबंधितांवर योग्य ती कारवाई करावी आणि सार्वजनिक निधीच्या झालेल्या नुकसानीची वसुली करण्याबाबतही प्रशासनाने विचार करावा

