पिंपरी चिंचवड : वुई टुगेदर फाउंडेशनच्या वतीने दुर्बल, गरजू,पीडित, वंचित, विद्यार्थ्यांसाठी आर्थिक सहाय्यता निधी वाटप व दहावी, बारावी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार असा दुहेरी कार्यक्रम चिंचवड येथे पार पडला.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका महापौर रवी लांडगे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते तर राष्ट्रपती सन्मानित, प्राध्यापिका, शिल्पागौरी गणपुले या प्रमुख पाहुण्या व वक्त्या म्हणून उपस्थित होत्या.
फाउंडेशनच्या वतीने प्रत्येक वर्षी पिंपरी चिंचवड शहरातील गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक अर्थसहाय्य मदत केली जाते. व दहावी बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कारही केला जातो
संपूर्ण पिंपरी चिंचवड शहरातून अशा गरजू विद्यार्थ्यांची निवड केली जाते.
वुई टुगेदर फाउंडेशनचे अध्यक्ष मधुकर बच्चे यांनी या कार्यक्रमाचे प्रस्ताविक केले.
आपल्या प्रास्ताविकामध्ये फाउंडेशन वतीने आत्तापर्यंत केलेल्या व पुढील कार्याविषयी मधुकर बच्चे यांनी उपस्थितांना सविस्तर माहिती दिली.
महापौर रवी लांडगे यांनी उपस्थित विद्यार्थी व पालकांना अत्यंत मौलिक शब्दात मार्गदर्शन केले व वुई टुगेदर फाउंडेशन ही संस्था अत्यंत मोलाचे व स्तुत्य कार्य करीत आहे. आजचा कार्यक्रम हा अत्यंत आगळ्यावेगळ्या पद्धतीचा आहे या फाउंडेशनने असेच कार्य पुढे करीत राहावे त्यासाठी रवी लांडगे यांनी संस्थेला शुभेच्छा दिल्या
राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त प्राध्यापिका शिल्पा गौरी गणपुले यांनी अत्यंत प्रभावीपणे विद्यार्थी व पालकांना कमी वेळेत परंतु विद्यार्थी व पालकांना समजेल असे खूप प्रभावी मार्गदर्शन केले.
विद्यार्थ्यांची शिक्षणाची पुढची दिशा व अभ्यासाची पद्धत व सध्या स्थितीवर अत्यंत मौलिक असं मार्गदर्शन केले.
यावेळी उपस्थित असणाऱ्या काही पालकांनी अत्यंत भावनिक अशा आपल्या भावना व्यक्त केल्या वुई टुगेदर फाउंडेशनचे आभार मानताना अनेक पालक, विद्यार्थी भावनिक होत होते कारण त्यांच्या शैक्षणिक खर्चाचा काही प्रमाणात का होईना परंतु आर्थिक बोजा या संस्थेने उचला हे आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे व हे आम्ही आमच्या आयुष्यात व भविष्यात कधी विसरणार नाही अशा भावना अनेक पालकांनी व विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या.
वुई टुगेदर फाउंडेशन अध्यक्ष मधुकर बच्चे ,उपाध्यक्ष रवींद्र काळे, सचिव जयंत कुलकर्णी, सहसचिव मंगला डोळे- सपकाळे खजिनदार दिलीप चक्रे, सल्लागार रवींद्र सागडे, खुशाल दुसाने, सलीम सय्यद,अजित कुलथे, दारासिंह मन्हास, सौरभ शिंदे,
श्रीनिवास जोशी, शंकर कुलकर्णी, उल्हास दाते, झाकीर सय्यद, विलास गटने, के रंगराव ,अरविंद पाटील, विलास जगताप, बाळासाहेब जगताप, सदाशिव गुरव, दिलीप पेटकर, अर्जुन पाटोळे, जावेद शेख, अनिल शिंदे, धनंजय मांडके, जितेंद्र निखळ, रोहिणी बच्चे, अभिजीत पवार, सोनाली डावरे, अवधूत कुलकर्णी, वासंती काळे, एम के शेख, अनिल पोरे, श्रावणी बच्चे, असावरी बच्चे, धनराज गवळी, आदींनी हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी हिरारीने पुढाकार घेतला व यशस्वी केला.
संस्थेच्या सहसचिव मंगला डोळे-सपकाळे यांनी अत्यंत प्रभावी सूत्रसंचालन केले.
संस्थेचे उपाध्यक्ष रवींद्र काळे यांनी आभार मानले.



