!-- afp header code starts here --> मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस रक्तदान शिबिराचे आयोजन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस रक्तदान शिबिराचे आयोजन

 


आळंदी (अर्जुन मेदनकर) : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसा निमित्त सामाजिक बांधिलकीतून आळंदी ग्रामीण व आळंदी शहर भारतीय जनता पक्षाचे वतीने उत्साहात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. 

  आळंदी ग्रामीण मंडळाचे अध्यक्ष पाटीलबुवा गवारी यांच्या हस्ते भारत माता प्रतिमा पूजन करून रक्तदान शिबिराची सुरुवात करण्यात आली. या प्रसंगी भाजपचे ज्येष्ठ नेते पांडुरंगशेठ ठाकूर, सरचिटणीस राहुल घोलप, युवा मोर्चा अध्यक्ष उमेश थोरवे, उपाध्यक्ष प्रथमेश लेखंडे, सरचिटणीस प्रथमेश होले, माजी जिल्हा सरचिटणीस गहिनीनाथ लेखंडे, किसान मोर्चा अध्यक्ष सुरेश लेखंडे, ग्रामीण मंडळ उपाध्यक्ष देवानंद बवले, माजी सभापती कल्पना पाटीलबुवा गवारी, सोशल मीडिया अध्यक्ष कार्तिक पिंगळे, सचिव गुरुदास गवारी, कामगार आघाडी अध्यक्ष सोमनाथ वहिले, उपाध्यक्ष केतन चौधरी, बंडूबाबा पालवे, रवींद्र महाराज जोशी गुरुजी, पुणे जिल्हा सरचिटणीस प्रिया पवार, श्रीकृष्ण देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते.

  या रक्तदान शिबिरासाठी रक्तसंकलन जीवनधारा ब्लड बँक, धानोरी यांनी परिश्रम पूर्वक काम पाहीले. या शिबिरात नागेश पोळ, संतोष राजणे, किशोर शिंदे, गणेश तरटे, संजय गायकवाड, संदीप आदिक  रक्तदात्यांसह अनेकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. आळंदी ग्रामीण मंडळाचे अध्यक्ष पाटीलबुवा गवारी यांचेसह कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम पूर्वक शिबीर यशस्वी केले.

थोडे नवीन जरा जुने