पुणे: ' आंत्रप्रिन्युअर्स इंटरनॅशनल'च्या वतीने दि.२९ जुलै २६ रोजी 'भारतरत्न' स्व. जे.आर.डी. टाटा यांची जयंती 'उद्योजक दिन' म्हणून साजरी केली जाणार आहे. या ३३ व्या वार्षिक पुरस्कार सोहळ्यात, उद्योजकता, संशोधन व नवोपक्रम, सेवा क्षेत्र, सामाजिक योगदान, कृषी, शाश्वतता आणि औद्योगिक परिसंस्थेला चालना देणे या क्षेत्रांमधील ७ उत्कृष्ट संस्था व उद्योजकांचा गौरव केला जाणार आहे.लेखक, उद्योजक अच्युत गोडबोले यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान केले जाणार आहे.हा कार्यक्रम दि २९ जुलै रोजी कोथरूड येथील मयूर कॉलनीतील एमईएस सभागृह येथे सायं ५.३० वा येथे संपन्न होत आहे. अशी माहिती अध्यक्ष अमोल जाधव यांनी दिली.
२०२६ चे पुरस्कार विजेते पुढीलप्रमाणे
उद्योजकतेतील उत्कृष्ट कामगिरी
पुरस्कार :
प्रवीण गुरव,संदेश सावंत,शितलकुमार पाटील, दयानंद पाटील (स्पीड इंजिनिअरिंग सोल्युशन्स प्रा)
संशोधन आणि नवोपक्रम क्षेत्रातील उद्योजकतेत उत्कृष्ट कामगिरी
पुरस्कार : शिवाजी वाघमारे (संचालक,क्यू साइन एनर्जी सोल्युशन्स)
सेवा क्षेत्रातील उद्योजकतेत उत्कृष्ट कामगिरी
पुरस्कार : डॉ अमेय पांगारकर (ए कन्सल्टन्सी )
सामाजिक दायित्व उद्योजकता
पुरस्कार : राहुल कोकीळ(सुमंथन लर्निंग रिसोर्स )
कृषी क्षेत्रातील उत्कृष्ट कार्य
पुरस्कार :आकाशचंद्र गौरठाकूर (आकाश ॲग्री सोल्युशन्स )
ग्रीन एंटरप्राइज अवॉर्ड पुरस्कार : डॉ.अस्मिता प्रभुणे (ग्रीन पिरॅमिड बायोटेक)
उद्योजकांना सहाय्य करणारी संस्था
पुरस्कार : जयदेव अक्कलकोटे (अध्यक्ष, चाकण एमआयडीसी औद्योगिक संघटना)
