एयर फोर्स च्या जाचक अट व म्हाडा च्या पुनर्वसनासाठी मानवी साखळी आंदोलन

 


पुणे : १९८० साली निकृष्ट दर्जाची म्हणून घोषित करण्यात आलेल्या म्हाडा वसाहतीतील एल-टाइप व एम-टाइप घरांच्या पुनर्विकासाचा प्रश्न गेली अनेक वर्षे प्रलंबित आहे. एअर फोर्स आणि एमईएस कॉलनी परिसरातील बांधकाम निर्बंधांमुळे सुमारे ८०० गाळेधारकांचे पुनर्विकासाचे स्वप्न रखडल्याचा आरोप रहिवाश्यांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर गाळेधारकांना न्याय मिळावा आणि पुनर्विकासाचा मार्ग तातडीने मोकळा करावा, या मागणीसाठी आज माजी आमदार सुनील टिंगरे व माजी उपमहापौर डॉ.सिद्धार्थ धेंडे यांच्या नेतृत्वाखाली रहिवाश्यांनी मानवी साखळी करीत तीव्र आंदोलन केले. या वेळी  म्हाडा व एअर फोर्स चा निषेध करण्यात आला .

     आंदोलन सकाळी ११ वाजता एमईएस कॉलनी गेट येथे, एअर फोर्स व राज्य शासनाचे बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणासमोर, पोस्ट ऑफिससमोर, येरवडा येथे करण्यात आले.

 यावेळी म्हाडा च्या रहिवाश्यांची घरे मोडकळीस आली असून त्यांना तत्काळ न्याय मिळावा तसेच शासनाच्या बांधकामाला एक न्याय व गरीब रहिवाश्यांना एक न्याय हा दुजाभाव खपवून घेणार नसल्याचा इशारा माजी उपमाहपौर डॉ.सिद्धार्थ धेंडे यांनी यावेळी दिला.

         मुख्यमंत्री,पालकमंत्री सुनेत्रा वहिनी पवार व खासदार पार्थ पवार यांच्या माध्यमातून आपण हा प्रश्न सोडवण्यासाठी तातडीने प्रयत्न करणार असल्याचे माजी आमदार सुनील टिंगरे यांनी यावेळी नागरिकांना आश्वासन दिले .तसेव न्याय मिळेपर्यंत आपण या लढ्यात सहभागी होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

            यावेळी नगरसेविका सौ. नंदिनी सिद्धार्थ धेंडे, नगरसेविका सौ. शीतल सावंत, नगरसेवक सुहास टिंगरे आणि नगरसेवक रवीभाऊ टिंगरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या पुनर्विकासाच्या प्रश्नाकडे शासनाने तातडीने लक्ष द्यावे, बांधकामावरील निर्बंध दूर करून सुमारे ८०० गाळेधारकांना न्याय द्यावा, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे. या आंदोलनात मोठ्या संख्येने स्थानिक नागरिक .महिला व युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते .

थोडे नवीन जरा जुने