![]() |
पिंपरी चिंचवड : या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष सचिन चिखले यांनी मा. श्री. श्रावण हर्डीकर साहेब,व्यवस्थापकीय संचालक, पुणे मेट्रो रेल कॉर्पोरेशन लि. (महामेट्रो) निवड दिले आहे, की, पुणे व पिंपरी-चिंचवड शहरालगत मावळ तालुका असून, या परिसरातील नागरिकांचे पुणे व पिंपरी-चिंचवड शहराशी मोठ्या प्रमाणावर दैनंदिन दळणवळण आहे.
सध्या पिंपरी ते निगडी (भक्ती-शक्ती) या मेट्रो मार्गाचे काम प्रगतिपथावर असून, पुणे जिल्ह्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आणि भविष्यातील मेट्रो विस्ताराच्या दृष्टीने विविध प्रकल्पांवर चर्चा व नियोजन सुरू आहे.
मावळ तालुक्यातील देहूरोड, तळेगाव, वडगाव, कामशेत आणि लोणावळा या परिसरातून दररोज विद्यार्थी, कामगार, नोकरदार, व्यावसायिक तसेच इतर नागरिकांची पुणे व पिंपरी-चिंचवड शहराकडे मोठ्या प्रमाणावर ये-जा होत असते. त्यामुळे या संपूर्ण पट्ट्यासाठी जलद, सुरक्षित, सक्षम आणि पर्यावरणपूरक सार्वजनिक वाहतूक व्यवस्था निर्माण करणे ही भविष्यातील अत्यावश्यक गरज आहे.
या मेट्रो मार्गाचे महत्त्व :
१. मावळ तालुक्यात मोठ्या प्रमाणावर महाविद्यालये, शैक्षणिक संस्था, विद्यापीठे तसेच औद्योगिक कंपन्या कार्यरत असून, दररोज हजारो विद्यार्थी व कामगारांची वाहतूक या मार्गावरून होते.
२. मावळ परिसराच्या औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी नवीन MIDC उभारण्याच्या दृष्टीने शासनस्तरावर कार्यवाही सुरू आहे. भविष्यात औद्योगिक व व्यावसायिक क्षेत्राचा विस्तार झाल्यास या भागातील सार्वजनिक वाहतुकीवरील ताण मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे.
३. देहूरोड, तळेगाव, वडगाव, कामशेत ते लोणावळा हा संपूर्ण पट्टा झपाट्याने विकसित होत असून, वाढती लोकसंख्या, औद्योगिकीकरण आणि नागरीकरण यामुळे या भागातील नागरिकांचे पुणे व पिंपरी-चिंचवडशी असलेले दैनंदिन दळणवळण दिवसेंदिवस वाढत आहे.
४. सदर मेट्रो मार्गामुळे पुणे-पिंपरी-चिंचवड शहर आणि मावळ तालुका यांच्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम होऊन, रस्त्यावरील वाहतूक कोंडी, प्रवासाचा वेळ आणि खासगी वाहनांवरील अवलंबित्व कमी करण्यास मदत होईल.
५. भविष्यातील लोकसंख्या, औद्योगिक विकास आणि वाढत्या वाहतुकीचा विचार करता, आजच या मार्गाचे नियोजन व तांत्रिक अभ्यास सुरू करणे अत्यंत आवश्यक आहे.
त्यामुळे लोकहित, भविष्यातील वाहतुकीची गरज आणि मावळ तालुक्याचा वाढता औद्योगिक व नागरी विकास लक्षात घेता, निगडी (भक्ती-शक्ती) ते देहूरोड–तळेगाव–वडगाव–कामशेत–लोणावळा हा मेट्रो मार्ग प्रस्तावित करून त्याचा सविस्तर तांत्रिक व व्यवहार्यता अभ्यास करण्यात यावा.
तसेच, आगामी अर्थसंकल्पीय नियोजनामध्ये सदर मेट्रो मार्गाचा समावेश करून, या मार्गाचा DPR (Detailed Project Report) तातडीने तयार करून शासनाच्या मंजुरीसाठी सादर करण्यात यावा, ही आपणास नम्र विनंती.
या मागणीचा सकारात्मक व गांभीर्यपूर्वक विचार करून मावळ तालुक्यातील लाखो नागरिकांना सक्षम सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून देण्यासाठी आपण आवश्यक ती कार्यवाही कराल, अशी अपेक्षा आहे, सहकार्य अपेक्षित.
सचिन तुकाराम चिखले
शहराध्यक्ष – मनसे,
पिंपरी-चिंचवड शहर
