आळंदी ( अर्जुन मेदनकर) : आळंदी येथील चाकण चौक श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज मठ जवळील कॉर्नर शॉप किशोर भाऊ काशिनाथ मोझे यांचे चाकण चौक गोपाळपुरा रस्ता येथील दुकानाला रात्री दोनच्या सुमारास आग लागली. या आगीत दुकानातील साहित्य जळून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या वेळी परिसरातील सामाजिक कार्यकर्त्या मिराताई भोसले आणि चौकातील नागरिक व्यापारी, वाहतूक पोलिस यांनी तात्काळ अग्निशमन केंद्रास कळवून आग विझविण्यासाठी परिश्रम घेतले. आगीत दुकानातील मालासह इतर साहित्य आगीत भस्म साथ झाले. यात दुकान मालकाचे खूप मोठी वित्त हानी होऊन नुकसान झाले.
१० ऑक्टोबर २०२६ रोजी पहाटे ०२:४५ चे सुमारास आळंदी येथील चाकण चौक हेंद्रेवाडा येथील किराणा दुकानाचे मालक किशोर मोझे यांच्या दुकानाला आग लागल्याची माहिती नगरसेवक सुनील घुंडरे यांच्या कडून मिळाल्या नंतर तत्काळ आळंदी नगरपरिषद अग्निशमन केंद्रातील जवान यांनी घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली.
या घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही. मात्र दुकानातील माल आणि साहित्य जळून खाक झाल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले. आळंदी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी माधव खांडेकर व अग्निशमन विभाग प्रमुख यांच्या मार्गदर्शना खाली जवानांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन विद्युत पुरवठा बंद करून आग आटोक्यात आणली. प्राथमिक कारण शॉर्ट सर्किट असल्याचे बोलले जात आहे. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
या आगी वर नियंत्रण मिळविण्यासह आग विझविण्यासाठी जवान प्रसाद बोराटे, अजित कुऱ्हाडे, विनायक सोलंकी, सिद्धार्थ गावडे, सुरेश सुलाखे, साहील काळे, अमित घुंडरे, अंकित खोपडे यांनी दोन तास प्रयत्न पूर्वक आग विझविण्यास परिश्रम घेतले.
