MGID Header Code
Code End

टिळक चौक, निगडी बस स्टॉप येथे महामेट्रोचे काम सुरू असलेल्या ठिकाणी महानगरपालिकेची मुख्य पाईपलाईन फुटली, तत्काळ दुरुस्ती


मागील दोन-तीन दिवसांपासून महामेट्रोचे पिलरचे काम सुरू आहे आणि त्याच लगत ही मुख्य पाईपलाईन होती. कामादरम्यान पाईपलाईन फुटल्याने हजारो लिटर पाणी वाया गेले,आणि पूर्ण पाणी रस्त्यावर आले होते.

यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचून वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण झाला होता आणि नागरिकांना, प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागला.

यावेळी असे निदर्शनास आले की, महामेट्रोच्या ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे ही घटना घडली आहे. काम करताना योग्य ती काळजी न घेतल्यामुळे ही मोठी हानी झाली आहे. आता प्रर्यत ४ ते ५ वेळा अशा घटना घडल्या आहेत, श्रीकृष्ण मदीरा समोरील रस्ता मागिल २ ते ३ वर्षे झाले खोदुन ठेवला आहे पाईप लाईन च्या कामासाठी आजुन हि काम पुर्ण झाले नाही भाविकांना नाहक त्रास हा ठेकेदार देत आहे 

त्याचबरोबर रस्त्यावरील मोठ-मोठे खड्डे हे देखील मेट्रोच्या कामामुळेच झाले आहेत. खड्ड्यांमुळे वाहनचालकांना आणि पादचाऱ्यांना रोज अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.

ही सर्व परिस्थिती लक्षात घेऊन या सर्व विषयावर आयुक्तांशी फोनवर चर्चा करण्यात आली. पाईपलाईन दुरुस्ती, रस्त्यावरील खड्डे बुजवणे आणि ठेकेदारावर कार्यवाही याबाबत ठाम भूमिका मांडली आहे.


ही बाब समजताच तात्काळ पाणी पुरवठा विभागाला कळवून तक्रार देण्यात आली आहे. पाणी पुरवठा विभागाकडून तात्काळ दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले आहे. सकाळी काम पुर्ण करण्यात आले 

श्री. सचिन चिखले

शहराध्यक्ष, मनसे पिंपरी-चिंचवड

सौ. अश्विनी सचिन चिखले-मराठे

प्रथम महिला नगरसेविका, मनसे पिंपरी-चिंचवड

थोडे नवीन जरा जुने