MGID Header Code
Code End

दिवाळीनिमित्त महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांना श्री स्वामी समर्थ सेवा प्रतिष्ठानतर्फे मिठाई वाटप

 


शिवतेजनगर : दिवाळी सणाचे औचित्य साधून श्री स्वामी समर्थ सेवा प्रतिष्ठान, शिवतेजनगर यांच्या वतीने पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातील सफाई कर्मचाऱ्यांना मिठाईचे वाटप करण्यात आले.

शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी अहोरात्र मेहनत घेणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांचे योगदान अत्यंत मोलाचे आहे. सणासुदीच्या काळातही आपले कर्तव्य प्रामाणिकपणे बजावणाऱ्या या कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविण्याच्या उद्देशाने प्रतिष्ठानच्या वतीने हा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला.

या कार्यक्रमाचे आयोजन श्री स्वामी समर्थ सेवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी नगरसेवक मा. नारायण बहिरवाडे यांनी केले होते.

यावेळी प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष श्री. राजीव गुणवंत, सामाजिक कार्यकर्ते प्रा. कल्याणवाणी, श्री. राजेंद्र हळी, डॉ. प्रियंका सपकाळ आदी उपस्थित होते.

तसेच पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाचे आरोग्य निरीक्षक श्री. सतीश रोकडे, आरोग्य सहाय्यक श्री. राहुल कुकुर्डी, मुकादम श्री. विजय डोलारे, श्री. संजय हिवाळे, श्री. कैलास मांढरे आणि श्री. सुभाष कामले आदींची उपस्थिती होती.

समाजातील प्रत्येक घटकाचा दिवाळी सण आनंदात साजरा व्हावा आणि समाजासाठी अहोरात्र सेवा देणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त व्हावी, या सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून प्रतिष्ठानने राबविलेल्या या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले.

थोडे नवीन जरा जुने