MGID Header Code
Code End

अनधिकृत बांधकामे व अतिक्रमणांवरील कारवाईला गती देण्याचे अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांचे निर्देश…



महापालिकेच्या आरक्षित भूखंडांवरील अतिक्रमणे, पदपथांवरील अतिक्रमणे आणि अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याच्या सूचना… 

पिंपरी चिंचवड : आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या निर्देशानुसार अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांच्या अध्यक्षतेखाली पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनातील मधुकर पवळे सभागृह येथे अनधिकृत बांधकामे व अतिक्रमणांवरील कारवाईचा आढावा घेण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस बांधकाम परवानगी विभागाचे सहशहर अभियंता सुनील बागवानी, कार्यकारी अभियंता, उपअभियंता, सर्व क्षेत्रीय अधिकारी आणि बीट निरीक्षक उपस्थित होते. 

बैठकीत महापालिकेच्या मालकीच्या भूखंडांवरील अतिक्रमणांचा आढावा घेण्यात आला. या भूखंडांवरील अतिक्रमणे निष्कासित करण्यासाठी आवश्यक प्रस्ताव तयार करून पुढील आठवड्यात निष्कासनाची कारवाई करण्याच्या सूचना संबंधित क्षेत्रीय अधिकारी, नगररचना विभागाचे अधिकारी आणि बीट निरीक्षक यांना देण्यात आल्या. 

क्षेत्रीय कार्यालयांच्या कार्यक्षेत्रातील सार्वजनिक पदपथांवरील अतिक्रमणे हटविण्याची नियमित कारवाई सुरू ठेवावी, असे निर्देश देण्यात आले.

थोडे नवीन जरा जुने