MGID Header Code
Code End

आळंदी नगरपरिषदेत घनकचरा व्यवस्थापन कार्यशाळेचे आयोजन

 


आळंदी (अर्जुन मेदनकर) : महाराष्ट्र शासनाच्या स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) २.० अंतर्गत क्षमता बांधणी (Capacity Building) या घटकाखाली आज दिनांक १६ नोव्हेंबर २०२६ रोजी आळंदी नगरपरिषदेच्या सभागृहात घनकचरा व्यवस्थापन नियम, २०२६ च्या अनुषंगाने विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

 यासोबतच केंद्र शासनाच्या 'नमस्ते' (NAMASTE) योजनेअंतर्गत स्वच्छता व सफाई कर्मचाऱ्यांसाठी 'सफाई सुरक्षा प्रशिक्षण' पार पडले आणि आळंदी नगरपरिषदेतील सर्व स्वच्छता कर्मचाऱ्यांना सुरक्षा साधनांचे (PPE किट) वितरण करण्यात आले.  

राज्य अभियान संचालनालयाच्या निर्देशानुसार आयोजित या कार्यशाळेत मे. कौटिल्य मल्टिक्रियेशन प्रा.लि. (मुंबई) या संस्थेमार्फत सफाई कर्मचारी, मुकादम, घनकचरा विभाग कर्मचारी तसेच नगरपरिषदेतील सर्व विभागाच्या कर्मचाऱ्यांना घनकचरा व्यवस्थापन व कामाच्या ठिकाणच्या सुरक्षिततेबाबत सखोल मार्गदर्शन करण्यात आले. शहराची स्वच्छता व नागरिकांचे आरोग्य अबाधित ठेवण्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांचे आरोग्य सुरक्षित राहावे आणि त्यांना आधुनिक सुरक्षा साधनांचा वापर करता यावा, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.  

या कार्यक्रमास आळंदी नगरपरिषदेचे सन्माननीय नगराध्यक्ष, सन्माननीय उपनगराध्यक्ष, सर्व विषय समित्यांचे सन्माननीय सभापती तसेच सर्व सन्माननीय नगरसेवक व नगरसेविका उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते स्वच्छता कर्मचाऱ्यांना पीपीई (PPE) किट प्रदान करून त्यांच्या कार्याचे कौतुक करण्यात आले व त्यांना सुरक्षित कामासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. याप्रसंगी नगरपरिषदेचे अधिकारी व स्वच्छता विभागाचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

थोडे नवीन जरा जुने