TCS layoff protest : कर्मचारी कपात: IT कर्मचारी संघटनेचा आरोप – ३०,००० नोकऱ्या धोक्यात; कंपनीचा इन्कार

 


नवी दिल्ली: टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) कडून मोठ्या प्रमाणात कर्मचारी कपात केली जात असल्याचा आरोप करत, युनियन ऑफ IT अँड ITES एम्प्लॉईज (UNITE) या संघटनेने मंगळवारी देशातील अनेक शहरांमध्ये आंदोलन केलं.

ही संघटना सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्स (CITU) च्या समर्थनाने चालते. त्यांनी केंद्र सरकारकडून हस्तक्षेपाची मागणी केली असून दावा केला की TCS मधील प्रत्यक्ष कर्मचारी कपात ही समोर येत असलेल्या आकडेवारीपेक्षा खूपच मोठी असू शकते.

UNITE ने फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे की,

“TCS ही कंपनी बेकायदेशीररीत्या मोठ्या प्रमाणावर कर्मचारी कपात करत आहे, विशेषतः मध्यम-कारकीर्दीत असलेल्या कर्मचाऱ्यांना लक्ष्य करत आहे आणि केवळ नफ्यासाठी लोकांची उपजीविका उध्वस्त करत आहे. हे फक्त नोकऱ्यांवरच नाही, तर कर्मचाऱ्यांच्या प्रतिष्ठा, हक्क आणि भविष्यासाठी देखील मोठा धोका आहे.”

कंपनीचा इन्कार

TCS ने Business Line ला दिलेल्या निवेदनात या आरोपांना “चुकीचे आणि दिशाभूल करणारे” असे संबोधले. कंपनीच्या म्हणण्यानुसार, हे बदल केवळ एकूण ६ लाख कर्मचाऱ्यांच्या २% लोकांवर परिणाम करतील. म्हणजे सुमारे १२,००० पदांवर परिणाम होणार आहे.

कंपनीने स्पष्ट केलं की ही पुनर्रचना म्हणजे “भविष्यासाठी तयार” अशी संस्था बनवण्याची प्रक्रिया आहे, ज्यात क्लाउड, AI आणि डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन वर अधिक लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे. प्रभावित कर्मचाऱ्यांना सेव्हरन्स आणि ट्रांझिशन सपोर्ट दिला जाईल, असंही कंपनीने सांगितलं.

AI मुळे मोठा बदल?

Reuters ने याआधी अहवाल दिला होता की TCS १२,००० हून अधिक कर्मचाऱ्यांना कमी करणार आहे. तज्ञांच्या मते, हे केवळ एक सुरुवात आहे आणि भारतातील $२८३ अब्ज मूल्याच्या IT क्षेत्रात AI मुळे येणाऱ्या मोठ्या उलथापालथीचं लक्षण असू शकतं.

अंदाजानुसार, पुढील २-३ वर्षांत ५००,००० हून अधिक नोकऱ्या गायब होऊ शकतात.

TCS च्या म्हणण्यानुसार ही कपात AI मुळे नाही तर कौशल्यातील तफावतीमुळे (skill mismatch) करण्यात येत आहे. मात्र, हे देशातील सर्वात मोठ्या खाजगी नियोक्त्याकडून होणारी आजवरची सर्वात मोठी कर्मचारी कपात असल्याने, अनेकजण याकडे उद्योगातील खोलात चाललेल्या बदलांचं संकेत म्हणून पाहत आहेत.

CEO कृष्णिवासन यांना ₹२६.५ कोटी पगारवाढ

दुसरीकडे, TCS चे CEO के. कृष्णिवासन यांना आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये एकूण ₹२६.५ कोटींचं वार्षिक वेतन मिळालं, जी गेल्या वर्षीपेक्षा ४.६% वाढ आहे, असं कंपनीच्या वार्षिक अहवालात नमूद आहे.

यात ₹१.३९ कोटी मूळ पगार, ₹२.१२ कोटी भत्ते व सुविधा, आणि ₹२३ कोटी कमिशन यांचा समावेश आहे.

या वेतनावर सोशल मीडियावर नाराजी व्यक्त होत असून, काहीजण म्हणत आहेत की CEO चा पगार कंपनीतील मध्यम कर्मचाऱ्याच्या पगाराच्या ३२९.८ पट आहे.

थोडे नवीन जरा जुने