मुंबई (Maratha Reservation) : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईच्या आझाद मैदानावर सुरू असलेले मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण आता निर्णायक वळणावर आले आहे. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे, तसेच मराठवाड्यातील मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्रे देण्याची मागणी पूर्ण व्हावी, यासाठी जरांगे यांनी २९ ऑगस्टपासून आझाद मैदानावर अनिश्चितकालीन उपोषण सुरू केले आहे.
या आंदोलनाला आता पाचवा दिवस उजाडला असून, मुंबई पोलिसांनी जरांगे यांच्या कोअर कमिटीला आझाद मैदान तातडीने रिकामे करण्याची नोटीस बजावली आहे. मात्र, जरांगे यांनी “मी मेलो तरी आझाद मैदान सोडणार नाही.” असा इशारा या नोटीसीला दिला आहे,
पोलिसांची नोटीस आणि जरांगेंचा निर्धार
मुंबई पोलिसांनी मंगळवारी (२ सप्टेंबर २०२५) जरांगे पाटील यांना नोटीस पाठवली, ज्यामध्ये आंदोलनासाठी दिलेल्या परवानगीच्या अटी-शर्तींचे उल्लंघन झाल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. आंदोलनासाठी केवळ एका दिवसाची परवानगी (२९ ऑगस्ट, सकाळी ९ ते सायंकाळी ६) देण्यात आली होती, तसेच आंदोलकांची संख्या ५,००० पेक्षा जास्त नसावी, अशी अट होती. मात्र, आंदोलनात ३५,००० ते ४५,००० आंदोलक सहभागी झाले असून, आझाद मैदानासह आजूबाजूच्या परिसरात, जसे की सीएसटीएम, मरीन ड्राइव्ह, आणि पी. डी. मेलो रोडवर, मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी आणि नागरिकांना त्रास झाला आहे.
या नोटीसीत जरांगे यांनी माध्यमांना दिलेल्या काही वक्तव्यांचाही उल्लेख आहे, ज्यामुळे त्यांच्या आंदोलनाला अवैध ठरवण्यात आले आहे. बॉम्बे उच्च न्यायालयाने सोमवारी (१ सप्टेंबर २०२५) या आंदोलनाला “बेकायदेशीर आणि व्यत्यय आणणारे” ठरवत, मंगळवारी दुपारपर्यंत आझाद मैदान आणि दक्षिण मुंबईतील रस्ते रिकामे करण्याचे निर्देश दिले होते.
जरांगे यांनी या नोटीसीला प्रत्युत्तर देताना सांगितले, “आम्ही कोणत्याही नियमांचे उल्लंघन केलेले नाही. न्यायदेवतेच्या एका शब्दावर आम्ही रस्ते रिकामे केले. आता सरकारने आमच्यावर अन्याय केला तरी, सातारा आणि हैदराबाद गॅझेट लागू होईपर्यंत मी आझाद मैदान सोडणार नाही. मराठे काय असतात, हे ३५० वर्षांनंतर सरकारला दाखवू.” त्यांनी पुढे सरकारला इशारा दिला, “आमच्या पोरांना हात लावला, तर तुमच्या नेत्यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही.”
दरम्यान, आज झालेल्या न्यायालयात झालेल्या सुनावनीत कोर्टाने हे सर्व बेकायदेशीर सुरू असून मुंबई ३ वाजेपर्यत खाली करण्याचे सरकारला आदेश दिले आहे. त्यामुळे आता काय कारवाई होणार हे पहावे लागणार आहे.
Court orders Maratha protesters to vacate Mumbai by 3 pm