PCMC : भक्ती शक्ती निगडी - कॅनबे चौक- चाकण एमआयडीसी टप्पा-5 नवीन मेट्रो मार्गिका, भाजपा आमदार महेश लांडगे यांची सूचना

 



- मेट्रो प्रशासन सर्व्हे अन्‌ डीपीआर तयार करणार

पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड शहरात मेट्रो विस्तार करताना भक्ती शक्ती निगडी- कॅनबे चौक (तळवडे) ते चाकण एमआयडीसी टप्पा-5 अशी नवीन मार्गिका प्रस्तावित करण्यात येणार आहे. त्यासाठी सर्व्हे आणि डीपीआर तयार करण्यात येणार आहे. त्यासाठी आमदार महेश लांडगे यांनी आग्रही भूमिका घेतली आहे.

पिंपरी-चिंचवड शहर व चाकण औद्योगिक पट्ट्यासाठी महत्त्वाकांक्षी मानला जाणारा भक्तीशक्ती चौक निगडी ते चाकण मेट्रो मार्ग आता प्रत्यक्षात वेगाने आकार घेण्याच्या मार्गावर आहे. या प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) महा-मेट्रोकडून सादर करण्यात आला. यावेळी मनपा आयुक्त शेखर सिंह, महा-मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

आमदार महेश लांडगे म्हणाले की, भोसरी- दिघी परिसरात औद्योगिक आणि निवासी क्षेत्राचा झपाट्याने विकास होत आहे. आगामी 25 वर्षांचा विचार करता या भागात मेट्रो कनेक्टिव्हीटी आवश्यक आहे. मेट्रोचे काम करण्यासाठी डीपीआर हा सर्वसमावेशक आणि शहरातील सर्व भागांना समान न्याय देणारा असायला हवा. ‘डीपीआर’ तयार करण्यापूर्वीच प्रशासनाने लोकप्रतिनिधींना विश्वासात घेणे अपेक्षीत आहे.

भोसरी परिसरात नवीन स्टेशन हवे...


भोसरी- दिघी परिसरात औद्योगिक आणि निवासी क्षेत्राचा झपाट्याने विकास होत आहे. आगामी 25 वर्षांचा विचार करता या भागात मेट्रो कनेक्टिव्हीटी आवश्यक आहे. मेट्रोचे काम पूर्ण करण्यासाठी डीपीआर हा सर्वसमावेशक आणि शहरातील सर्व भागांना समान न्याय देणारा असायला हवा. त्यासाठी ‘डीपीआर’  अंतिम करताना लोकप्रतिनिधींच्या सूचनांचा समावेश करावा. नाशिक फाटा- भोसरी- मोशी- चाकण या नवीन मार्गिका तसेच भक्तीशक्ती निगडी- कॅनबे चौक- चाकण एमआयडीसी टप्पा-5 मार्गिकासासाठी सर्व्हे करावा, अशी सूचना आमदार लांडगे यांनी केली आहे.


प्रतिक्रिया :
चाकण औद्योगिक पट्टयातून पुण्याकडे जाणारे प्रवासी भक्ती-शक्ती-कॅनबे चौक- चाकण एमआयडीसी टप्पा-5 या नवीन मार्गिकेने प्रवास करतील. त्यामुळे पुणे-नाशिक महामार्गावरील रहदारी व कोंडी कमी होण्यास मदत होईल. भोसरीमध्ये नवीन स्टेशन प्रस्तावित करावे. त्या अनुशंगाने या मार्गाचा प्राधान्याने विचार करुन तशी दुरूस्ती ‘डीपीआर’मध्ये करावी, अशी सूचना प्रशासनाला केली आहे. यावर ठोस कार्यवाही करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये बैठक घेण्यात येणार आहे.

- महेश लांडगे, आमदार, भाजपा, पिंपरी-चिंचवड, पुणे

प्रतिक्रिया :
भक्ती-शक्ती-कॅनबे चौक ते चाकण एमआयडीसी टप्पा-5 आणि नाशिक फाटा- भोसरी- मोशी- चाकण अशी नवीन मार्गिका प्रस्तावित करावी. तसेच, भोसरीमध्ये नवीन स्टेशन निर्माण करावे, अशी सूचना आहे. त्या अनुशंगाने प्रशासनाकडून येत्या आठ दिवसांत पाहणी करुन सर्वेक्षण व अहवाल तयार करण्याची सूचना संबंधित अधिकाऱ्यांना केली आहे. 

- श्रावण हर्डिकर, व्यवस्थापकीय संचालक, पुणे मेट्रो

.

थोडे नवीन जरा जुने