पिंपरी चिंचवड : अनेक ठिकाणी गणेश स्थापना असतात विविध उपक्रम, देखावे, मनोरंजन असतात.
पण काही ठिकाणी वेगळेपण असते, अशाच एका दिव्यांग शाळेत गणेश स्थापना केली आहे.
अभिराज फाउंडेशन या दिव्यांग मुलांच्या शाळेमध्ये वुई टुगेदर फाउंडेशनचे अध्यक्ष मधुकर बच्चे यांच्या हस्ते श्री ची आरती संपन्न झाली.
यावेळी वुई टुगेदर फाउंडेशनच्या सह सचिव मंगला डोळे -सपकाळे, सलीम सय्यद, रवींद्र सागडे (सल्लागार ) आदी पदाधिकारी व सर्व दिव्यांग विद्यार्थी व कर्मचारी वर्ग हे उपस्थित होते.
वुई टुगेदर फाउंडेशन कायमच आभिराज फाउंडेशन मध्ये विविध निमित्ताने येत असते व श्यक्य ते सहकार्य करीत असतात.
फाउंडेशन अध्यक्ष मधुकर बच्चे व सर्व पदाधिकाऱ्यानी दिव्यांग विद्यार्थ्यांसोबत सवांद साधत त्याने अनेक कलागून जाणून घेतले.
अभिराज फाउंडेशनचे डायरेक्टर रमेश मुसुडगे यांनी आलेल्या मान्यवरांचा सत्कार व आभार मानले.या वेळी विद्यार्थी व शिक्षक वर्ग उपस्थित होते.