केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी संसदेत सलग नवव्यांदा केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. हे कोणत्याही अर्थमंत्र्यांसाठी प्रथमच घडले आहे.
हा अर्थसंकल्प आर्थिक वर्ष 2026–27 (एप्रिल 2026 ते मार्च 2027) साठी असून, रविवारी सादर स्वतंत्र भारतातील पहिला अर्थसंकल्प ठरला आहे.
सरकारने देशी विदेशी दारूवर टॅक्स वाढवला आहे.
यंदाचा अर्थसंकल्प पूर्णपणे पेपरलेस स्वरूपात सादर करण्यात आला आहे. महागाई नियंत्रण, महसूल वाढ आणि वित्तीय तूट कमी करणे — ही सरकारपुढील मोठी आव्हाने होती.
# मोठा बदल : परदेश प्रवास स्वस्त
परदेश प्रवास पॅकेजवर लागणारा TCS (Tax Collected at Source)
आधी: 5% ते 20%
आता: फक्त 2% (कोणतीही किमान मर्यादा नाही)
# काय स्वस्त झाले?
औषधे व आरोग्य
कॅन्सरवरील 17 औषधे स्वस्त
7 दुर्मिळ आजारांच्या औषधांवर आयात शुल्क सवलत
मधुमेह (शुगर) औषधे स्वस्त
मोटार अपघात भरपाई करमुक्त
# ऊर्जा व इंधन
CNG गॅस स्वस्त
बायोगॅस स्वस्त
सोलर एनर्जीशी संबंधित उपकरणे स्वस्त
बॅटरी स्वस्त
# घरगुती व दैनंदिन वस्तू
मायक्रोवेव्ह ओव्हन स्वस्त
बूट-चप्पल स्वस्त
बीडी स्वस्त
# व्यापार, निर्यात व सेवा
चामडे व कापड निर्यात स्वस्त
मच्छीमारांसाठी निर्यात सुलभ व स्वस्त
कुरिअर पाठवणे स्वस्त
