L
पिंपरी चिंचवड : अभिराज फाउंडेशन वाकड ( दिव्यांग मुलांची शाळा व कार्यशाळा) येथे शुक्रवार दि. २७ मार्च २०२६ रोजी क्रीडा दिन आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मैत्री आधार सामाजिक संस्था पिंपळे निलख चे श्री भरत इंगवले सर आणि श्री राजेंद्र टकले सर उपस्थित होते. त्याचबरोबर अभिराज फाउंडेशनचे विद्यार्थी पालक संघाचे प्रतिनिधी श्रीमती आर्या मॅडम आणि श्री उगाडे सर हे देखील उपस्थित होते.
क्रीडा स्पर्धाची सूरूवात क्रीडा ज्योत प्रज्वलित करून व क्रीडा शपथ घेऊन करण्यात आली. क्रीडा स्पर्धेमध्ये 50 मीटर धावणे, चेंडू ने मनोरा पाडणे, अडथळा शर्यत, तीन पायांची शर्यत इत्यादी क्रीडा प्रकार घेण्यात आले.सर्व विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने या क्रीडा स्पर्धेत सहभाग घेतला होता. स्पर्धा झाल्यावर लगेचच बक्षीस वितरण करण्यात आले पाहुण्यानीं आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला व अभिराज फॉउंडेशन चे सर्व कर्मचारी व पाहुण्याचे आभार मानले. या क्रीडा स्पर्धे साठी अभिराज फॉउंडेशन च्या संचालक सौ. स्वाती तांबे व रमेश मुसूडगे यांनी शुभेच्छा दिल्या.
