!-- afp header code starts here --> छत्रपती शिवाजी महाराज व्याख्यानमाला'; ४२ व्या वर्षात पदार्पण

छत्रपती शिवाजी महाराज व्याख्यानमाला'; ४२ व्या वर्षात पदार्पण

 


निगडी :स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ, निगडी यांच्या वतीने आयोजित करण्यात येणारी आणि प्राधिकरणातील वैचारिक मेजवानी समजली जाणारी 'छत्रपती शिवाजी महाराज व्याख्यानमाला' यंदा आपल्या ४२ व्या वर्षात पदार्पण करत आहे. ही व्याख्यानमाला १ मे ते ३ मे २०२६ या कालावधीत दररोज सायंकाळी ७ वाजता स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृह (पेठ क्र. २५, प्राधिकरण, निगडी) येथे होणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.

यंदाच्या व्याख्यानमालेचे स्वरूप खालीलप्रमाणे असेल:

शुक्रवार, १ मे (शुभारंभ): पुणे लोकसभेचे खासदार श्री. प्रदीपदादा रावत हे 'भारतीय राज्यघटनेतील धर्मस्वातंत्र्य आणि इस्लाम' या विषयावर पहिले पुष्प गुंफणार आहेत.

शनिवार, २ मे: इतिहास अभ्यासक श्री. जगन्नाथराव लडकत 'अजिंक्य योद्धा बाजीराव आणि पालखेडची लढाई' या विषयावर मार्गदर्शन करतील.

रविवार, ३ मे (समारोप): व्याख्यानमालेचा समारोप 'सांस्कृतिक क्रांती की भ्रांती' या विषयाने होईल. प्रसिद्ध प्राध्यापक आणि सांस्कृतिक मार्क्सवादाचे अभ्यासक डॉ. प्रसन्न देशपांडे हे विचार मांडतील.

गेल्या चार दशकांपासून ही व्याख्यानमाला सातत्याने प्रबोधनाचे कार्य करत आहे. तरी परिसरातील नागरिकांनी या तिन्ही दिवशी मोठ्या संख्येने उपस्थित राहून ज्ञानाचा लाभ घ्यावा. श्रोत्यांनी व्याख्यान वेळेत सुरू होण्यासाठी किमान १५ मिनिटे आधी उपस्थित राहावे, असे आवाहन सावरकर मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क: ८४४६४२२९६५.

थोडे नवीन जरा जुने