!-- afp header code starts here --> MPSC मार्फत गट-क सेवेच्या 1884 पदांसाठी मुख्य परीक्षेची घोषणा

MPSC मार्फत गट-क सेवेच्या 1884 पदांसाठी मुख्य परीक्षेची घोषणा

MPSC announces main examination for 1884 posts of Group-C service


MPSC recruitment : महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) मार्फत महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त मुख्य परीक्षा २०२६ ची अधिसूचना जारी करण्यात आली असून एकूण १८८४ रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार असून अर्ज करण्याची शेवटची तारीख ०४ जून २०२६ निश्चित करण्यात आली आहे.


या भरतीमध्ये उद्योग निरीक्षक, कर सहायक, तांत्रिक सहायक आणि लिपिक-टंकलेखक या पदांचा समावेश आहे. यामध्ये लिपिक-टंकलेखक पदासाठी सर्वाधिक १६७३ जागा, कर सहायक – ७३, उद्योग निरीक्षक – ०९ आणि तांत्रिक सहायक – ०४ जागा उपलब्ध आहेत.


शैक्षणिक पात्रतेनुसार, उद्योग निरीक्षक पदासाठी सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी, तंत्रज्ञानातील डिप्लोमा किंवा विज्ञान शाखेतील पदवी आवश्यक आहे. कर सहायक पदासाठी कोणत्याही शाखेतील पदवीसह मराठी टंकलेखन ३० शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी टंकलेखन ४० शब्द प्रति मिनिट पात्रता आवश्यक आहे. तांत्रिक सहायक पदासाठी पदवीधर असणे आवश्यक असून लिपिक-टंकलेखक पदासाठी पदवीसह मराठी किंवा इंग्रजी टंकलेखनाचे ज्ञान बंधनकारक आहे.


अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय ०१ फेब्रुवारी २०२६ रोजी १८ ते ३८ वर्षे दरम्यान असावे. मागासवर्गीय, आ.दु.घ आणि अनाथ प्रवर्गातील उमेदवारांना ५ वर्षांची वयोमर्यादेत सवलत देण्यात आली आहे.


या भरतीसाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी ₹५४४ परीक्षा फी तर मागासवर्गीय, आ.दु.घ आणि अनाथ प्रवर्गासाठी ₹३४४ फी निश्चित करण्यात आली आहे.


निवड झालेल्या उमेदवारांची नियुक्ती संपूर्ण महाराष्ट्रात केली जाणार आहे. परीक्षेसाठी अमरावती, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, नाशिक, नवी मुंबई आणि पुणे येथे परीक्षा केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. पूर्व परीक्षा १२ जुलै २०२६ रोजी होणार आहे.


----------------------------------

अधिक माहितीसाठी - येथे क्लिक करा


MPSC अधिकृत संकेतस्थळ - येथे क्लिक करा


जाहिरात (PDF) - येथे क्लिक करा


ऑनलाईन अर्ज - येथे क्लिक करा


----------------------------------

थोडे नवीन जरा जुने