पिंपरी चिंचवड : श्री स्वामी समर्थ सेवा प्रतिष्ठान शिवतेज नगर, या संस्थेच्या वतीने दहावी आणि बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ आयोजित केला होता. याप्रसंगी प्रमुख मार्गदर्शन म्हणून प्राध्यापक विजय नवले यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना सांगितले. शिस्त आणि सातत्य आणि योग्य दृष्टिकोनातूनच यशाचा मार्ग खुला होतो. मी कोण होणार यापेक्षा मी समाजाला काय देणार? हा विचार अधिक महत्त्वाचा असल्याचे त्यांनी सांगितले.
करिअर निवडताना स्वतःची आवड आणि क्षमता यांना प्राधान्य देण्याचा सल्लाही त्यांनी दिला. कार्यक्रमास विशेष अतिथी म्हणून मावळचे खासदार श्रीरंग आप्पा बारणे देखील उपस्थित होते. शैक्षणिक यश ही केवळ गुणाची नव्हे तर जिद्द, सातत्य आणि कठोर परिश्रम याची पावती असते असे विद्यार्थ्यांचे अभिनंदन करताना सांगितले. कार्यक्रमाचे अध्यक्ष AICT चे अध्यक्ष प्रा. राजेश सपरा होते.
सध्या विद्यार्थ्यांना आर्टिफिशल इंटेलिजन्स (AI ) मुळे आम्हाला नोकरी मिळणार अडचण निर्माण अशी भीती वाटते. परंतु असं काही होणार नाही असे मला वाटते. त्यामुळे आर्टिफिशल इंटेलिज चांगल्या पद्धतीने उपयोग करून घ्या असा सल्ला त्यांनी दिला. या कार्यक्रमाचे संयोजन श्री स्वामी समर्थ सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष व मा. नगरसेवक नारायण बहिरवाडे यांनी केले होते. याप्रसंगी लेखक व समुपदेशक श्री राजेंद्र घावटे, प्रा. कल्याण वाणी, प्रा.हरि नारायण शेळके, राजु गुणवंत, इ. व्यासपीठावर उपस्थित होते. सारिका रिकामे यांनी श्री स्वामी समर्थ सेवा प्रदर्शन विषयी माहिती सांगितली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक नारायण बहिरवाडे यांनी केले. राजेंद्र घावटे सर यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यानंतर विद्यार्थ्यांना श्री स्वामी समर्थ सेवा प्रतिष्ठानच्या वतीने सन्मान चिन्ह व भेटवस्तू मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी क्षमा काळे, शोभा नलगे,स्नेहा गुणवंत नीलिमा भंगाळे, तराळे काका, मेघराज बागी, रोहन नंदनवाड, ज्ञानदेव नारखेडे,गीता पाटील यांनी परिश्रम घेतले.

