विद्यार्थ्यांच्या खात्यावर DBT (Direct Benefit Transfer) माध्यमातून शालेय साहित्याकरिता अनुदानाची रक्कम तातडीने जमा करा - राहुल रूपराव कोल्हटकर यांची मागणी

 


पिंपरी चिंचवड : महानगरपालिका शाळांतील विद्यार्थ्यांच्या खात्यावर DBT (Direct Benefit Transfer) माध्यमातून शालेय साहित्याकरिता अनुदानाची रक्कम तातडीने जमा करण्यात यावी.

 महानगरपालिका शाळांचे शैक्षणिक सत्र सुरू होऊन जवळपास दोन महिने पूर्ण होत आले आहेत. मात्र, अद्यापही महानगरपालिका शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आवश्यक शालेय साहित्य उपलब्ध झालेले नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून पालकांनाही आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

शालेय साहित्य ठेकेदारामार्फत वितरित करण्याच्या प्रक्रियेमध्ये विविध स्तरांवर निर्णयप्रक्रियेत विलंब होत असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, विद्यार्थ्यांच्या खात्यावर DBT (Direct Benefit Transfer) माध्यमातून थेट रक्कम जमा करण्याचा प्रस्ताव आपण स्थायी समितीसमोर मांडला होता. मात्र, सदर प्रस्तावाला मान्यता मिळाली नाही, ही बाब अत्यंत खेदजनक आहे. 

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताला सर्वोच्च प्राधान्य देणे ही सर्व संबंधितांची जबाबदारी आहे. त्यामुळे शालेय साहित्याच्या वितरणात होणारा विलंब टाळण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना तातडीने आवश्यक साहित्य खरेदी करता यावे, यासाठी DBT पद्धत हा प्रभावी व पारदर्शक पर्याय ठरू शकतो. अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते राहुल कोल्हटकर यांनी आयुक्त विजय सूर्यवंशी यांचेकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

आपण एक जबाबदार प्रशासकीय अधिकारी म्हणून राज्य शासनाच्या धोरणानुसार आणि आपल्या अधिकारांचा वापर करून संबंधित शिक्षण विभाग तसेच इतर संबंधित विभागांना विद्यार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये DBT माध्यमातून शालेय साहित्याकरिता अनुदानाची रक्कम तातडीने जमा करण्याबाबत आवश्यक आदेश द्यावेत, ही नम्र विनंती.

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताचा विचार करून याबाबत त्वरित सकारात्मक निर्णय घ्यावा, ही अपेक्षा.

 राहुल रूपराव कोल्हटकर

सामाजिक कार्यकर्ते

मो. ९९२३९०५०१९

माहितीस्तव प्रत :

१. मा. श्री. रवी लांडगे साहेब

महापौर,

पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी, पुणे.

२. मा. श्री. अभिषेक बारणे साहेब

अध्यक्ष, स्थायी समिती,

पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी, पुणे.

थोडे नवीन जरा जुने