MGID Header Code
Code End

महापौरांचा सेक्टर 22 दौरा: पूरप्रश्न आणि पीसीएमसी कॉलनीच्या दुरुस्तीला आश्वासन

पिंपरी चिंचवड : प्रभाग क्रमांक 13 मधील निगडी सेक्टर नंबर 22, संग्रामनगर झोपडपट्टी, श्रमिकनगर, राहुलनगर, फातिमा मस्जिद परिसर आणि 1 ते 15 बिल्डिंग या भागात दरवर्षी पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी घुसते. त्यामुळे नागरिकांचे घर, कपडे, अन्नधान्य यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. नागरिकांना दरवर्षी हा त्रास सहन करावा लागतो.

या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी राहुलनगर ते निगडी स्मशानभूमीपर्यंत कॅन्टोन्मेंट/मिलिटरीच्या माळरानावरून येणारे पावसाचे पाणी थेट स्मशानभूमी मागील नाल्यास जोडण्यासाठी मोठा पावसाळी नाला बांधण्यात यावा, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने काल करण्यात आली.

त्याचप्रमाणे PCMC कॉलनीतील जीर्ण झालेल्या इमारतींबाबत महापालिकेने दिलेल्या नोटीसचा विषयही महापौरांसमोर मांडण्यात आला. या इमारतींची संपूर्ण दुरुस्ती पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने करावी अशी मागणी नागरिकांनी केली.

यावेळी मा. महापौरांनी सदर परिसराची प्रत्यक्ष पाहणी केली. नागरिकांच्या मागण्या समजून घेतल्या. त्यांनी नागरिकांना आश्वासन दिले की,"पीसीएमसी कॉलनीतील सर्व इमारतींची दुरुस्ती पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने केली जाईल."

या पाहणी दरम्यान प्रभागातील सामाजिक कार्यकर्ते राजू केरप्पा गायकवाड सामाजिक कार्यकर्ते अक्षयजी करंडे, प्रबुद्ध कांबळे, शेहना हाजी शेख, अल्ताफ भाई शेख, नजीर भाई शेख, गणेश वाघमारे, मंगेश जाधव चनालबाबी अल्ताफ शेख  रेखा सूर्यवंशी, दिपाली जाधव, रेखा भोसले, सुवर्णा सूर्यवंशी, व इतर सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महापौरांनी वेळ देऊन दौरा केल्याबद्दल सर्व नागरिकांनी त्यांचे आभार मानले.

सचिन चिखले

शहराध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, पिंपरी-चिंचवड

अश्विनी सचिन चिखले - मराठे 

मा. नगरसेविका मनसे

थोडे नवीन जरा जुने