MGID Header Code
Code End

स्वच्छ, सुरक्षित आणि रेबीजमुक्त तीर्थक्षेत्र आळंदीसाठी नागरिकांना आवाहन

 


नगरपरिषदेस सहकार्य करा :- मुख्याधिकारी माधव खांडेकर

आळंदी (अर्जुन मेदनकर) : स्वच्छ, सुरक्षित आणि रेबीजमुक्त तीर्थक्षेत्र आळंदीसाठी सर्व नागरिकांनी व सोसायट्यांनी प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन आळंदी नगरपरिषद मुख्याधिकारी माधव खांडेकर यांनी केले आहे.

आळंदी नगरपरिषद, आळंदी ( पुणे ) आरोग्य व स्वच्छता विभागा चे वतीने जाहीर आवाहन करण्यात आले आहे. ​आळंदी शहरातील सर्व  नागरिक, गृहनिर्माण संस्थांचे ( सोसायटी ) पदाधिकारी, चेअरमन, सेक्रेटरी व रहिवाशांना आवाहन करण्यात आले आहे. 

  यामध्ये आळंदी नगरपरिषदे मार्फत भटक्या कुत्र्यांचे निर्बीजीकरण ( Animal Birth Control - ABC ) आणि रेबीज प्रतिबंधक लसीकरण मोहीम प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. ​शहरातील भटक्या श्‍वानांची वाढती संख्या नियंत्रित करणे, रेबीज सारख्या आजारांचा प्रादुर्भाव रोखणे आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी ही मोहीम हाती घेण्यात आली आहे.

​या मोहिमेच्या यशस्वी अंमलबजावणी साठी आपल्या परिसरातील, गल्ली बोळांतील किंवा सोसायटीच्या आवारातील बिन - निर्बीजीकरण केलेल्या भटक्या कुत्र्यांची अचूक माहिती नगरपरिषदेस देणे आवश्यक आहे. ​

माहिती कळविण्यासाठी संपर्क समन्वय अधिकारी पंकज खैरे ​नगरपरिषद कर्मचारी, आळंदी नगरपरिषद संपर्क  क्रमांक  9860074523 असून त्यांना  नागरिकांनी संपर्क करून माहिती देण्यात यावी.

    आपल्या परिसरातील भटक्या कुत्र्यांची अंदाजे संख्या, नेमके ठिकाण व आवश्यक तपशील वरील क्रमांकावर संपर्क साधून अथवा व्हॉट्सॲपद्वारे देण्यात यावी. ​ही मोहीम शासन नियमां नुसार सुरक्षितरीत्या राबविली जात असून, शस्त्रक्रिया व लसीकरणा नंतर श्वानांना काळजी पूर्वक पुन्हा त्याच अधिवासात ( मूळ जागेवर ) सोडण्यात येणार असल्याचे आरोग्य विभाग प्रमुख यांनी सांगितले. 

 ​स्वच्छ, सुरक्षित आणि रेबीजमुक्त तीर्थक्षेत्र आळंदीसाठी सर्व नागरिकांनी व सोसायट्यांनी प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन आळंदी नगरपरिषद मुख्याधिकारी माधव खांडेकर यांनी केले आहे.

थोडे नवीन जरा जुने