शिवचरण उज्जैनकर फाउंडेशन तर्फे उपक्रमाचे आयोजन
मुक्ताईनगर (अर्जुन मेदनकर) : येथील नवीन माध्यमिक विद्यालय पारंबी तालुका मुक्ताईनगर जिल्हा जळगाव विद्यालयाचे मुख्याध्यापक डॉ. शिवचरण उज्जैनकर यांनी शिवचरण उज्जैनकर फाउंडेशन तर्फे शिक्षक दिना निमित्त विद्यालयातील शिक्षकांना प्रमाणपत्र, पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात केले.
याच वेळी प्रशालेतील इयत्ता आठवी ते दहावी मधील प्रत्येकी एक विद्यार्थी व एक विद्यार्थिनी अशा सहा गुणवंत मुलांचा सन्मान करण्यात आला.
सामाजिक बांधिलकी तून सत्कार समारंभात गुणवंत शिक्षक, विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. या उपक्रमाचे परिसरातून कौतुक होत आहे.
